पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पीएम नरेंद्र मोदी विमानतळावर आगमन झाल्यानंतर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यानंतर दीक्षाभूमी आणि तिथून माधव नेत्रालय येथे ते जाणार आहेत.
पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर भेट देऊन मनपा आणि पोलिस प्रशासनाद्वारे पाहणी करण्यात आली तसेच आवश्यक ते निर्देश देण्यात आले. पीए मोदींचा हा नागपूर दौरा खूप महत्वाचा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पीएम मोदींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी पंतप्रधान रेशीमबागेच्या स्मृती मंदिर स्थळाला भेट देवून डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. यावेळी १५ मिनिटं मोदीजी स्मृती मंदिर परिसरात थांबणार आहेत. स्मारक समितीच्या वतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करतील. संघाच्या स्मृती मंदिर स्थळाला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत.
या दौऱ्यात पीएम मोदी दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. पीएम मोदी यांनी राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी संघात पूर्णवेळ प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम केले. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपूरात एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदींची ही भेट फार महत्त्वाची ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.