Nana Patole: पीएम नरेंद्र मोदी कधी खरे बोलतात का? पेन्शनवरून नाना पटोले यांचा सवाल

Nana Patole: अहमदनगरमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय.
Nana Patole: पीएम नरेंद्र मोदी कधी खरे बोलतात का? पेन्शनवरून नाना पटोले यांचा सवाल
Nana PatoleSaam TV
Published On

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

नवीन पेन्शनवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. पंतप्रधान हे कधी खरं बोलतात , टोला नाना पटोले यांनी मारलाय. नव्या पेन्शन योजनेमुळे लोकांना आनंद झाला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यावरून नाना पटोलेंनी टोला मारलाय. ते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य अधिवेशनात बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपण लगेच पहिल्या कॅबिनेटमध्ये पेन्शनचा निर्णय घेऊ, असं प्रतिपादन पटोले यांनी केलंय.

Nana Patole: पीएम नरेंद्र मोदी कधी खरे बोलतात का? पेन्शनवरून नाना पटोले यांचा सवाल
Nana Patole on PM Narendra Modi : नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे सरदार, पटोले यांचा घणाघात

नवीन पेन्शन योजना नको तर आम्हाला जुनीच पेन्शन योजना हवी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलीय. त्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने अधिवेशन बोलवलंय. या अधिवेशनात बोलतांना नाना पटोले यांनी नव्या पेन्शनवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवी पेन्शन योजना सुरू केलीय.

मात्र या योजनेवरून कर्मचारी वर्ग नाराज आहे. अनेकांनी जुनी पेन्शन योजना परत सुरू करावी, अशी मागणी केलीय. त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीके केलीय. पंतप्रधान मोदी यांची योजना बनियागिरीची योजना आहे. गेल्या दहा वर्षाचे सरकार बघितले तर पूर्ण बनियागिरी वापरली. अनिल अंबनीचे १ हजार ७०० कोटींचे कर्ज माफ केले. त्याची प्रसिद्धी केली नाही. मात्र गोरगरिबांना थोड काही दिले तर त्याची प्रसिद्धीच प्रसिद्धी करत आहे.

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही.आमचं सरकार येताच पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुन्या पेन्शनचा निर्णय घेऊ. येणाऱ्या विधानसभेत मविआचे सरकार आणायचे असून आता पेन्शनचे टेन्शन घ्यायचं नाही असंही नाना पटोले म्हणालेत.

काय आहे नवी पेन्शन

मोदी सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यासाठी नवी पेन्शन योजना सुरू केलीय. याला यूनिफाइड पेन्शन स्कीम म्हटलं जातं. यात सरकारने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना फिक्स पेन्शन देण्याची तरतूद केलीय. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या ५०% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार. ६० हजार निवृत्तीवेतन असल्यास ३० हजार रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com