Kalyan News: 'एप्रिल फूल'वरून राजकारण रंगलं; शिंदे गट आणि मनसेत सोशल मीडियावर 'पोस्ट वॉर', कोण काय म्हणालं?

Maharashtra Political News : कल्याणमध्ये 'एप्रिल फूल'वरून राजकारण रंगलं आहे. शिंदे गट आणि मनसेत सोशल मीडियावर 'पोस्ट वॉर' सुरु झालं आहे.
kalyan political
kalyan News Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Kalyan News : कल्याण शीळ रोडवरील पुलाच्या कामावरून मनसेने नेते राजू पाटील यांनी उपहासात्मक बॅनर लावत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. एप्रिल फूल करत लावण्यात आलेला हा बॅनर चर्चेचा विषय ठरला होता. या बॅनरनंतर शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सोशल मीडियावर एक एप्रिल रोजी राजू पाटील हे आमदारकीची शपथ घेणार असल्याची पोस्ट केली. 'मनसेच्या शेडो कॅबिनेटमध्ये निर्णय. त्यांच्या शपथविधीला जगभरातील राष्ट्राध्यक्ष कल्याणमध्ये येत असल्याची पोस्ट करत मनसे नेते राजू पाटील यांची खिल्ली उडवली. राजेश मोरे यांच्या उपहासात्मक टीकेला आता मनसे नेते राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे नेते राजू पाटील यांनी संजय निरुपम यांचा एक जुना व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय निरुपम यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. तसेच आमदार झाल्याबरोबर निरुपम यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमच्या जोडीने आंदोलन करणार असल्याबाबत पोस्ट करत टोला आमदार मोरेंना लगावला आहे. पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने मनसे आणि शिवसेना शिंदे गटात जुंपली आहे. तरी या पुलाचे काम कधी पूर्ण होणार, याबाबत मात्र कुणीच बोलत नसून आमचाच एप्रिल फूल झाला असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे .

kalyan political
Ghibli फोटो तयार करणे पडू शकते महागात; एका चुकीने बँक खाते होईल रिकामे

कल्याण शीळ रस्त्यावर पलावा जंक्शन येथे सुरु असलेल्या सुरु असलेल्या दोन पलावा पूलासंदर्भात मनेसे नेते राजू पाटील यांनी एक बॅनर लावला. या बॅनरवर लिहिले होते की, कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन ३१ एप्रिल रोजी होणार आहे. संथ गतीने सुरु असलेल्या पूलासंदर्भात लिहून प्रशासन आणि सत्ताधारी यांना लक्ष्य केले होते. यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना 'एक्स' करीत सवाल उपस्थित केला होता. हा बॅनर सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत राजू पाटील यांना लक्ष्य केलं.

kalyan political
Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाची जीवघेणी स्टंटबाजी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांच्या पोस्टमध्ये, राजू पाटील यांची आमदारपदी निवड. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये निर्णय, शपथ विधीसाठी ट्रम्प यांच्यासह पुतीन किंग जॉग कल्याणला येणार. शपथ विधी दिनांक आणि स्थळ उजव्या कोपऱ्यात पहा, असे म्हटले आहे. ते क्लिक केल्यावर एप्रिल फूल असे येते. यानंतर राजेश मोरे यांच्या टीकेला मनसे आमदार नेते राजू पाटील यांनी उत्तर दिलं.

आमदार राजेश मोरे यांच्याच पोस्टच्या कमेंटमध्ये संजय निरुपम यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संजय निरुपम यांनी शिंदे पिता-पुत्रावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे आमदार झाल्यानंतर मोरे साहेब तुमच्या जोडीने संजय निरुपम विरोधात आंदोलन करणार असल्याचे प्रतिउत्तर राजू पाटील यांनी दिले आहे.

एकंदरीतच एप्रिल फूलचे औचित्य साधत मनसे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकमेकांना लक्ष केलं जात आहे. मात्र या पुलाचे काम कधी होणार? वाहतूक कोंडीतून आमची सुटका कधी होणार, याबाबत मात्र कुणीच ठोस सांगत नसल्यासाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

kalyan political
Share Market Today : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दणका; निफ्टी-सेन्सेक्समध्ये पडझड, कोणते शेअर्स ठरले टॉप गेनर्स?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com