Ghibli फोटो तयार करणे पडू शकते महागात; एका चुकीने बँक खाते होईल रिकामे

Ghibli Photo : घिबली फोटो तयार करणे महागात पडू शकते. तुमच्या एका चुकीमुळे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घिबली फोटो तयार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Ghibli
Ghibli Photo : Saam tv
Published On

सायबर चोरटे लोकांना लुटण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. त्यातच सोशल मीडियावर Ghibli फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु आहे. अनेक जण Ghibli स्टाइल फोटो तयार करू लागले आहेत. मात्र, Ghibli फोटो तयार करण्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे Ghibli स्टाइल फोटो तयार करण्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

Ghibli स्टाइल फोटो तयार करण्यावरून अनेक एक्सपर्टने चिंता व्यक्ती केली आहे. Ghibli स्टाइल फोटो तयार करण्याचा नादात युजर्स त्यांची फेशियल डिटेल्स दुसऱ्या वेबसाईटला शेअर करत आहे. तुमची संपूर्ण माहिती सायबर स्कॅमर्सपर्यंत पोहोचत आहे. हीच बाब तुमच्यासाठी धोक्याची आहे.

Ghibli
Narendra Modi : नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? महाराष्ट्रातील दोन नावांची जोरदार चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट

ChatGPT व्यतिरिक्त अनेक अॅप आणि पोर्टल Ghibli स्टाइल फोटो तयार करण्याचा दावा करत आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्कॅमर्स देखील बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक करू शकतात.

वेबसाइट आणि टूल्स

तुम्ही चॅटजीपीटी ऐवजी दुसरी वेबसाइट आणि टूल्सचा वापर करून Ghibli फोटो तयार करत असाल तर सतर्क राहण्याची गरज आहे. अनेकांना वाटत असेल तर तुम्ही फक्त एक फोटो तयार करत आहात. परंतु ही बाब फक्त Ghibli पर्यंत मर्यादित नाही. तुम्ही खरंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मला फेशियल डिटेल्स देत आहात.

Ghibli
New Rules : गॅस सिलिंडर, UPI आणि बँक...;1 एप्रिलपासून नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष महागात पडणार, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

महत्वाच्या माहितीवर चोरट्यांनी नजर

बनावट वेबसाईटवरून Ghibli स्टाइल फोटो तयार करण्याचा नादात तुमच्या फेस डिटेल्सच्या माध्यमातून सायबर चोरटे फसवू शकतात. फेशियल डिटेल्सच्या माध्यमातून अनेकांचा फोन अनलॉक होतो. या माहितीच्या आधारे स्कॅमर्स फोन अनलॉक करून आर्थिक फसवणूक करु शकतात. तसेच यामुळे वेगवेगळ्या डिजिटल सर्व्हिसचा वापर करू शकतात. एकंदरीत फेशियल डिटेल्समुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.

Ghibli
Horoscope Today : जुने आजार बळावतील, आरोग्याची काळजी घ्या; ३ राशींच्या लोकांचा दिवस तणावपूर्ण जाण्याची शक्यता

सायबर चोरटे फेशियल डिटेल्सचा वापर करून तुमचे अॅप अनलॉक करू शकतात. तसेच तुमच्या UPI Pin चा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्यामुळे Ghibli फोटो तयार करताना अधिकृत वेबसाईचा वापर करा. बनावट वेबसाइटच्या माध्यमातून Ghibli फोटो तयार केल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com