Narendra Modi : नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? महाराष्ट्रातील दोन नावांची जोरदार चर्चा, पाहा स्पेशल रिपोर्ट

Narendra Modi News : मोदींचा वारसदार कोण ? याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्याला निमित्त ठरलंय खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य....पाहूया राऊतांनी काय म्हटलंय आणि त्याला फडणवीसांनी काय उत्तर दिलंय.
Narendra Modi
Narendra Modi newsANI
Published On

राऊतांना यांच वेळी मोदींच्या वारसदारांची आठवण करून देण्य़ाची का गरज पडली. खरंच मोदींचा वारसदार शोधला जातोय का. या बरोबरचं इतर अनेक प्रश्न तयार झालेत. हा दावा जरी विरोधकांनी केला असला तरी त्यामागे मोदींचाच एक अलिखीत नियम कारणीभूत ठरलाय. पार्टी विथ डिफरन्स म्हणून विशेष ओळख सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षात वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना नेत्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येतं असा हा नियम आहे .

Narendra Modi
Akola News : अकोल्यातील 'या' गावात पसरली कॉलराची साथ; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मोदींचा वारसदार ठरवणारा नियम काय?

वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना महत्वाच्या पदापासून दूर करण्यात येत

या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश सल्लागार मंडळामध्ये करण्यात येतो.

या नेत्यांना निवडणूका आणि मंत्रिमंडळात प्रवेश दिला जात नाही.

वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना अनेक नेत्यांना जबाबदारीतून याआधी याच नियमाचा दाखला देत पदं नाकारली

Narendra Modi
Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; ऐन रब्बी हंगामात बळीराजाला रडवलं

मोदी रविवारी नागपूरात आले या नागपूर दौऱ्यात त्यांनी तब्बल11 वर्षांनंतर रेशिमबागेतील संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालकांशी चर्चा केली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात मोदी पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयात गेले आणि त्यामुळे संघ आता मोदींचा वारसदार शोधत असल्याची चर्चा सुरु झाली.

आता मोदींचा वारसदार कोण असू शकतो ते देखील पाहुया...

अमित शाह, केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

Narendra Modi
Traffic Rules : ३ महिनांच्या आत चालान न भरल्यास...; वाहतूक नियमात मोठा बदल, जाणून घ्या

मोदींच्या वारसदारांमध्ये ज्या नावांची चर्चा आहे. त्यामध्ये २ नाव ही महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रातूनच असेल असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊतांच्या या दाव्याला देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण करणार आहेत त्यामुळे संघ मोदींचा वारसदार शोधत असल्याचा हा दावा करण्यात आला. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा मार्गदर्शक मंडळात रवानगी या अगोदरचं करण्यात आली आहे . आता जो नियम मोदींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. तोच नियम खुद्द मोदींसाठी देखील लागू होणार का याचं उत्तर खुद्द मोदीच आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com