Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; ऐन रब्बी हंगामात बळीराजाला रडवलं

Maharashtra Rain Update : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातलाय. ऐन रब्बी हंगामात पावसाने बळीराजाला रडवलं आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain Update Saam tv
Published On

Maharashtra Rain Update : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवळाळीने झोडपून काढलं आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन रब्बी हंगामात कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज अकोला, बीड, बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसरलाय. तर पुढील आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. हवामान विभागाकडून ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या १ आणि २ तारखेसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १ ते ३ एप्रिलपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. धुळे आणि नंदुरबारमध्येही उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Maharashtra Rain
buldhana : बुलढाणा हादरलं; पोलीस कर्मचाऱ्याला गळा आवळून संवपलं, बंद कारमध्ये आढळला मृतदेह

अकोल्याला अवकाळी पावसाचा फटका

अकोल्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. मुर्तीजापुर तालुक्यातील निपाणा गावात देखील अवकाळी पाऊस झाला. आज रात्री आठ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Rain
Himachal Landslide : हिमाचलच्या मणिकर्णमध्ये भूस्खलन, ६ लोकांचा जागीच मृत्यू

नाशकात अचानक अवकाळी

नाशिकच्या येवल्यात अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत होता. मात्र, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain
Abhijeet Bichukale New Look : नाद करायचा नाय...! अभिजीत बिचुकलेच्या नव्या लूकची चर्चा; २५ वर्षानंतर आयकॉनिक हेअर स्टाईल बदलली

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ

बुलढाण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे गहू व कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहर आणि परिसरात साडेपाच वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तर गहू , कांदा या पिकांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Rain
Marathi Language Row : बँक, रेल्वे स्टेशनमध्ये मराठीतच बोला, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक लागले कामाला

दुसरीकडे बीड जिह्यातही अवकाळी बरसली. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. बीडच्या पाटोदा तालुक्यातील परिसरात विजांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस बरसला. या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तर शेतकऱ्यांच्या उन्हाळी भाजीपाला पिकाला फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com