Marathi Language Row : बँक, रेल्वे स्टेशनमध्ये मराठीतच बोला, अन्यथा खळखट्याक; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक लागले कामाला

Marathi Language Row News : बँक, रेल्वे स्टेशनमध्ये मराठीतच बोललं पाहिजे, अन्यथा खळखट्याक करणार असल्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक कामाला लागले आहेत.
Raj thackeray
Raj thackeray News Saam tv
Published On

नितीन पाटणकर,साम टीव्ही

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात बँक आणि सरकारी आस्थापनांमध्ये मराठीचा वापर करण्याचा आग्रह धरला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित मेळाव्यात मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना संबोधित केले. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक कामाला लागले आहेत.

Raj thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'पुन्हा लाव रे तो व्हिडिओ'; जाहीर सभेत दाखवली गंगा प्रदुषणाची भीषण परिस्थिती, केंद्राचे ओढले कान, VIDEO

राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यातील मनसैनिक कामाला लागले आहेत. पुण्यात उद्यापासून वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये मराठीचा वापर केला नाही तर खळखट्याक करणार असल्याचा इशारा मनसैनिकांनी दिला आहे. मराठीच्या मुद्यावरून मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी इशारा दिला आहे. बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मराठीतच बोलण्याचा मनसेने आग्रह धरला आहे.

Raj thackeray
Raj Thackeray : गंगा प्रदुषण, हिंदूत्व, लाडकी बहीण ते संतोष देशमुख प्रकरण; राज ठाकरे यांच्या भाषणातील १२ मुद्दे, VIDEO

मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस म्हणाले, 'महाराष्ट्रात जे राहतात, त्यांनी मराठी बोललं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही मराठीचा मुद्दा घेतला आहे. आम्ही तो मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात मराठीमध्ये व्यवहार आणि बोललं पाहिजे. सर्वात आधी बँक आमच्या निशाण्यावर आहे. बँकेचा मुद्दा आधीच लावून धरला आहे. महाराष्ट्र बँकेत आंदोलन केलं होतं. त्यानंतर बँकेने सर्क्युलर काढून सर्व शाखेत मराठी भाषा अनिवार्य केली. त्याचप्रमाणे इतर बँकांना आवाहन करत आहोत. तुम्ही तुमच्या बँकेत मराठी लागू करा अन्यथा आम्हाला खळखट्याक करावा लागेल'.

Raj thackeray
buldhana : बुलढाणा हादरलं; पोलीस कर्मचाऱ्याला गळा आवळून संवपलं, बंद कारमध्ये आढळला मृतदेह

'आम्हाला कळतंय की, एटीएमवरही मराठी नाही, असे असेल तर आम्ही शांत बसणार नाही. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषी आहेत. अजित पवारांना पुण्यातील लोक सांगत आहेत की, मेट्रोमध्ये बिहारी भरले आहेत. दुसरीकडे अजित पवार आम्हाला सांगत आहेत की, कायदा हातात घेऊ नका, असे संभूस म्हणाले.

'सर्व शासकीय आस्थापनांमध्ये मराठी अनिवार्य पाहिजे. बँकामध्येही मराठी अनिवार्य हवी. बँकेत मराठी भाषेचा वापर होत नसेल, तर आम्ही आंदोलन करू. राज्य सरकार काहीच प्रयत्न करत नाही. राज्य सरकार कागदोपत्री घोडे नाचवत आहे, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com