Raj Thackeray : राज ठाकरेंचा 'पुन्हा लाव रे तो व्हिडिओ'; जाहीर सभेत दाखवली गंगा प्रदुषणाची भीषण परिस्थिती, केंद्राचे ओढले कान, VIDEO

Raj Thackeray News : राज ठाकरेंचा 'पुन्हा लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न पाहायला मिळाला आहे. त्यांनी जाहीर सभेतून गंगा प्रदुषणाची भीषण परिस्थिती दाखवली. गंगा नदीवरून केंद्राचे कान ओढले.
Raj Thackeray  News
Raj Thackeray Saam tv
Published On

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जंगी सभेचे आयोजन करण्यात आलंय. या सभेत राज ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर धडाडली. या सभेत राज ठाकरे यांनी गंगा प्रदुषण आणि कुंभ मेळ्यावर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी गंगा प्रदुषण आणि कुंभ मेळ्याच्या नियोजनावर टीका केली.

मनसे राज ठाकरे म्हणाले,गंगा स्वच्छ करावी, असं सर्वात आधी कोण बोललं असेल,तर ते माजी पंतप्रधान राजीव गांधी. मात्र अजून गंगा स्वच्छ झालेली नाही. पंतप्रधान मोदी देखील गंगा स्वच्छ करण्याविषयी बोलले होते. गंगेत स्थान केल्याने लाखो लोक आजारी पडले आहेत. गंगा, कुंभ मेळ्याचा अपमानाचा मुद्दा नाही. खरंतर प्रश्न गंगा नदीच्या स्वच्छतेचा आहे. या नदीत अंत्यसंस्कार केले जातात'.

'आपल्या देशातील नद्यांची अशी अवस्था आहे की, उत्तर प्रदेशातील लाखो लोक आंघोळ केल्यानंतर आजारी पडले आहेत. ते आजारी पडणारच. ज्या गंगेची परिस्थिती काय आहे? खरंतर गंगा नदीत कशा प्रकारचं पाणी असतं. त्या गोष्टी अजून थांबवल्या जात नाही. त्यांना वेगळ्या ठिकाणी जागा दिली जात नाही. तुम्हाला एक मिनिटासाठी गंगा नदीची परिस्थिती दाखवतो, असे राज ठाकरे म्हणाले.

'आतापर्यंत गंगा नदीवर ३३ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. व्हिडिओमध्ये महंताला नदीत टाकून दिलं. तेथील घाटावर प्रेत जाळली जात आहे. अग्नी दिल्यासारखं करतात, त्यानंतर तसेच प्रेत पाण्यात ढकलून देतात. हा कोणता धर्म? म्हणजे आपल्या नैसर्गिक गोष्टीवर धर्म आडवा येत असेल, तर काय करायचं? आपण सुधारणा करायला नको का? हजारो वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. आता एका घाटावर वेगळी जागा येत नाही का? लोक म्हणतात ते ऐकत नाही. दारू प्यायल्यावर पोलीस पकडतात. मग लोक टॅक्सीने जाऊ लागले. लोक सुधारले ना? या नद्या किती गलिच्छ आहेत. नद्या धर्माच्या नावाखाली बरबाद केल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापल्या धर्मात सुधारणा केल्या पाहिजे,असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com