Bollywood Actress : शारीरिक संबंध एन्जॉय करण्यासाठी, महिलांना हे माहीतच नाही, बॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Bollywood Actress neena gupta : बॉलिवूड अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. शारीरिक संबंध एन्जॉय करण्यासाठी असून हे महिलांना माहित नसल्याचं या अभिनेत्रीने म्हटलं आहे.
neena gupta News
neena gupta Saam tv
Published On

बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये दिसणारी अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या बोल्ड विधानासाठी चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्री नीना गुप्ता यांनी शीरीरिक संबंधावर भाष्य केलं. भारतातील ९५ टक्के महिलांना शारीरिक संबंध एन्जॉय करण्यासाठी असतो, हे माहीत नाही. नीना गुप्ता यांनी मुलाखतीत स्वत:च्या वयावरही भाष्य केलं.

neena gupta News
BJP Politics : भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका; पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं काय घडलं?

लिली सिंगला नीना गुप्ता यांनी विशेष मुलाखत दिली. यावेळी नीना गुप्ता यांनी तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. 'शारिरीक संबंध हा शब्द कुजबुज करत उच्चारायचे. आता मला तसे काही वाटत नाही. मला वाटते की, मी या विषयाला अधिकच महत्व देते. महिलांच्या बाबतीत मला वाईट वाटतं'.

नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, ' अनेक भारतीय महिलांना वाटतं की, शारिरीक संबंध केवळ पुरुषांना आनंद देण्यासाठी किंवा अपत्यांना जन्म देण्यासाठी असतात. बहुतांश महिलांना माहीतच नाही की, शारिरीक संबंधाचा आनंद स्रियांनाही मिळतो. महिलांना वाटतं की, पुरुषांना आनंदात ठेवण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी शारिरीक संबंध महत्वाचे असतात'.

neena gupta News
Taj Mahal : ताजमहल वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी? प्रेमाच्या प्रतिकावर कोणाचा मालकी हक्क? वाचा सविस्तर

या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी स्वत:चं वय सांगण्यास नकार दिला. मुलाखतीत नीना गुप्ता यांना वयाबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावेळी नीना गुप्ता म्हणाल्या, 'मी माझं वय सांगणार नाही. कारण मी माझ्या वयापेक्षा तरुण दिसते. परंतु मला वृद्ध महिलेच्या भूमिका मिळतात. आता मी माझं वय सांगितलं तर नंतर काय ऑफर येईल, माहीत नाही. त्यामुळे मी व्यावसायिक कारणांसाठी माझं वय सांगणार नाही'.

neena gupta News
Shah Rukh Khan : ५ सिनेमा, ३४०० कोटी रुपयांची कमाई; शाहरुख खानला कोणत्या सिनेमाने केले मालामाल? वाचा

नीना गुप्ता यांच्या करिअरविषयी बोलायचं म्हटलं तर, त्यांनी १९८२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नीना गुप्ता या त्यांच्या फिल्मी करिअरऐवजी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. 'पंचायत' सिनेमामुले नीना गुप्ता यांच्या लोकप्रियता आणि प्रसिद्धीत वाढ झाली. भारतात नीना गुप्ता यांच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com