Surabhi Jayashree Jagdish
वैद्यकीय अभ्यासातून असं दिसून आल आहे की, 25 ते 30 वर्षे वय हा महिलांसाठी गर्भधारणेचा सर्वोत्तम काळ आहे. या वयात शारीरिक यंत्रणा व्यवस्थित काम करते.
महिलांमध्ये २५ ते ३० वर्षांच्या वयात प्रजनन क्षमता जास्त असते. यावेळी गर्भधारणेतील समस्या कमी होतात.pregnant women
सहसा प्रत्येक महिलेच्या अंडाशयात जन्मत: २० लाख अंडी अर्थात ओव्हरीज असतात. परंतु, त्यांची संख्या कालांतराने कमी होऊ लागते. ज्यामुळे 30 वर्षांनंतर गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते.
30 वर्षांनंतर स्त्रियांमध्ये गर्भधारणेदरम्यान मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तणाव यासारख्या समस्या वाढू शकतात.
जर तुम्ही ३५ वर्षांनंतर आई होणार असाल तर नॉर्मल डिलीव्हरी होण्याची शक्यता कमी असते.
वयाच्या ३० ते ३५ व्या वर्षीही गर्भधारणा शक्य आहे. परंतु, अधिक शारीरिक समस्या असू शकतात.
वयाच्या 35 नंतर गर्भधारणेदरम्यान उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. याचा परिणाम मुलाच्या आरोग्यावर होऊ शकतो.
डॉक्टरांच्या मते, महिलांसाठी गर्भधारणेसाठी सर्वात योग्य वय 25 ते 30 वर्षे आहे. जेव्हा प्रजनन प्रणाली पूर्णपणे निरोगी राहते.