Buldhana Unseasonal Rain : अवकाळी संकट! ४००० हेक्टरवरील पिके, फळबागांना फटका; बुलडाण्यातील १६६ गावांतील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

Buldhana News : राज्यात सर्वदूर अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिकांना अधिक फटका बसत असून केळी, पपई, द्राक्ष या फळबागांचे देखील नुकसान झाले
Buldhana Unseasonal Rain
Buldhana Unseasonal RainSaam tv
Published On

बुलढाणा : हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरवीत झालेल्या अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील ४ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके आणि फळ बागांचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केला आहे. अगोदरच आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात देखील मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

राज्यात सर्वदूर अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिकांना अधिक फटका बसत असून केळी, पपई, द्राक्ष या फळबागांचे देखील नुकसान झाले आहे. यातच बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून सर्वदूर अवकाळी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी पिके आणि फळ, भाजीपाला वर्गीय पिके यांचे मोठे नुकसान केले. 

Buldhana Unseasonal Rain
Junnar : अवकाळीने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; जुन्नरमध्ये ५०० हेक्टर कांद्याचे नुकसान

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना फटका 

पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ४ हजार १८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तेरा पैकी नऊ तालुक्याना अवकाळीचा फटका बसल्याचे चित्र आहे. घाटावरील तालुक्याच्या तुलनेत घाटा खालील तालुक्यात जास्त नुकसान झाले आहे. अवकाळीचा सर्वात मोठा फटका नांदुरा तालुक्याला बसला आहे. आता शेतकऱ्यांना आता पंचनामे करण्याची प्रतीक्षा आहे. 

Buldhana Unseasonal Rain
Kalyan MNS : बँकेत मराठी भाषेच्या वापराबाबत मनसे आक्रमक; कल्याणमध्ये बँकांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

नंदुरबार जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करत पंचनामा करण्यास सुरवात
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांसोबतच घराचे देखील पडझड आणि नुकसान झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल पाठवला जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर आणि घराचं झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचनामे करणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com