Junnar : अवकाळीने आणले शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; जुन्नरमध्ये ५०० हेक्टर कांद्याचे नुकसान

Pune Junnar News : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र लाटेनंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कांद्यावर आवकाळी पावसाने थेट घाला घातला
Pune Junnar News
Pune Junnar NewsSaam tv
Published On

जुन्नर (पुणे) : अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचे आभाळच फाटले आहे. काढणीवर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आनळे आहे. अवकाळीमुळे जुन्नरमध्ये तब्बल ५०० हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले होते.  

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र लाटेनंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कांद्यावर आवकाळी पावसाने थेट घाला घातला. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती. उत्पादनासाठी वापरलेली खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक या सर्वांचा मोठा भांडवली खर्च त्यांनी उचलला होता. मात्र, या पावसाने कष्टाने उभे केलेले पीक अक्षरशः मातीमोल झाले.

Pune Junnar News
Parola Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त; पारोळा तालुक्यातील ४० गावांना फटका

कांद्याचे प्रचंड नुकसान 

आभाळातून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या आहेत. जुन्नर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तब्बल ५०० हेक्टरवरील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकांना जोपासत काढणीला आलेल्या कांद्याची शेती मातीमोल झाली आहे. यातून होणारे नुकसान हे न भरून निघणारे आहे. 

Pune Junnar News
Soyabean Price : सोयाबीनच्या दरात वाढ; सहा महिन्यानंतर प्रथमच दर ४६०० रुपयांवर

सोलापूरात मका, द्राक्ष बागांना फटका
सोलापूर
: सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी लावली. यात तालुक्यातील बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला असून अचानक आलेल्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. शेतकरी अनिल लंगोटे यांचा दीड एकरातील मका भुईसपाट झाला आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनेश जगताप यांच्या दीड एकर द्राक्ष बागेला ही बसला अवकाळी पावसाचा फटका बसून नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com