Soyabean Price : सोयाबीनच्या दरात वाढ; सहा महिन्यानंतर प्रथमच दर ४६०० रुपयांवर

Washim News : खरीप हंगामात सोयाबीन काढणी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी लागलीच विक्री केली. आवक वाढल्यानंतर दरात घसरण झाली होती. यानंतर दरात वाढ होईल या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवणूक केला
Soyabean Price
Soyabean PriceSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन आल्यानंतर त्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्याने सोयाबीन घरात साठवणूक केला होता. मात्र मागील पाच- सहा महिने दरात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसून सहा महिन्यानंतर सोयाबीन दरात पुन्हा वाढ झायी आहे. वाशीमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच सोयाबीनचे दर ४६०० रुपये प्रति क्विंटलवर पोहचले आहेत.

खरीप हंगामात सोयाबीन काढणी झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी लागलीच विक्री केली. मात्र सोयाबीनची आवक वाढल्यानंतर दरात घसरण झाली होती. यानंतर सोयाबीन दरात वाढ होईल या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवणूक केला होता. परंतु दर वाढले नाही. परिणामी काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात नाईलाजाने विक्री केली. आता खूप कमी शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. यानंतर दरात सुधारणा होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Soyabean Price
Ahilyanagar : वाळू तस्करांची दादागिरी; शेतकऱ्याला केली बेदम मारहाण, महिलांनाही धमकावले

वाशीम बाजार समितीत ४६०० चा दर 

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं असून तब्बल सहा महिन्यानंतर सोयाबीनने ४ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. तर बाजार समितीत ३३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

Soyabean Price
Parola Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त; पारोळा तालुक्यातील ४० गावांना फटका


किमान हमीभाव मिळण्याची आशा 
सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर ऑक्टोबर महिन्यापासून दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. अगदी तीन हजार आठशे रुपयापर्यंत दर खाली आले होते. यानंतर साधारण पाच- सहा महिने दरात वाढ झाली नाही. मात्र आता पुन्हा दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com