सुशील थोरात
अहिल्यानगर : वाळू तस्करांची दादागिरी अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. कारवाई करण्यासाठी येणाऱ्या पथकावर हल्ले करण्याचे प्रकार कायम समोर येत असतात. अशात आता दादागिरी करत शेतातून वाळूने भरलेले वाहन घेऊन जाणार्यांना विचारणा केल्याने वाळू तस्करांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर डंपर खाली घालून चिरडण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरात समोर आला आले.
एकीकडे सरकारने वाळू धोरण आखून प्रत्येक नागरिकाला मागेल तेवढी वाळू कमी दरात उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती. मात्र ही योजना आता फक्त कागदावरच असून सर्वसामान्य लोकांना वाळू ही महाग दरानेच विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे अजूनही वाळू तस्कर राजरोसपणे वाळू तस्करी करताना दिसून येत आहे. नगर तालुक्यातील शिंगवे परिसरात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून जो कोणी या तस्करीला आडवा येईल त्यास मारहाण करण्यात येत असल्याच्या घटना शिंगवे परिसरात घडत आहेत.
शेतातून वाहने नेत असल्याने नुकसान
वाळू तस्कर हे शेतकऱ्यांच्या जमिनीतून राजरोसपने वाळू तस्करी करत असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहेत. तसेच गावातून वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरमुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. मात्र याबाबत वाळू तस्करांना जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जाब विचारला म्हणून केली मारहाण
अहिल्यानगरच्या शिंगवे गावातील शेतकरी प्रकाश पुंड यांनी वाळू तस्करांकडून होत असलेल्या या दादागिरीमुळे जाब विचारला असता वाळू तस्करांनी पुंड यांच्यावर जीवघेणा हल्ला करत मारहाण केली. कुटुंबातील महिलांदेखत प्रकाश पुंड यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर त्यांना सोडवण्यास गेलेल्या वयोवृद्ध महिलांनाही डंपर खाली घालून मारण्याची भाषा वाळू तस्करांनी केल्यामुळे महिला भयभीत झाल्या. यामुळे आम्हाला कोणीतरी न्याय द्यावा संरक्षण द्यावे अशी मागणी आता शिंगवे गावातील ज्येष्ठ महिला परीघा पुंड यांनी केली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
तर या गावगुंडांना रोखण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन कमी पडत असून तलाठ्याच्या डोळ्यासमोर वाळू वाहतूक सुरू असूनही तलाठी कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले हे गावातून वाळू तस्कर आणि चंदन तस्करी करणाऱ्यामुळे नागरिक भयभीत आहे. शिंगवे गावातील नागरिकांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन वाळू तस्कर आणि चंदन तस्कर करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून नागरिकांची या गावगुंडांपासून सुटका करावी अशी मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.