Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, वडील सायकलचे पंक्चर काढायचे काम करायचे; लेकाने क्रॅक केली UPSC

Success Story OF Iqbal Ahmed Crack UPSC: उत्तर प्रदेशच्या इकबाल अहमदने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्याचे वडील सायकल पंक्चर काढण्याचे काम करायचे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा (UPSC) देऊन अनेकांचे सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. दोन दिवसांपूर्वी यूपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यूपीएससी परीक्षेत देशातील हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील इकबाल अहमद यांना यश मिळालं आहे. त्यांनी यूपीएससी २०२४ मध्ये ९९८ रँक प्राप्त केली आहे.

Success Story
Success Story: चार वर्षांची तयारी, १२ तासांची मेहनत; IIT टॉपर रमेश सूर्या तेजाची प्रेरणादायी कथा

इकबाल अहमद हे मूळचे संत कबीर जिल्ह्यातील कस्बा येथील रहिवासी. त्यांना हा प्रवास खूप खडतर होता. त्यांचे वडिल सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करायचे. यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. खूप संघर्षात त्यांचे बालपण गेले. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांना यश मिळाले.

आर्थिक परिस्थिती बेताची

इकबाल अहमद यांचा हा प्रवास खूप खडतर होता. त्यांना तीन लहान भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांचे वडील गावात चौकात सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करायचे. त्यांनी आपल्या मोठ्या मुलासोबत घराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला.

इकबाल अहमद यांनी इंटर कॉलेजमधून इंटरमीडिएट पूर्ण केले. त्यानंतर गोरखपूरमधून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ते दिल्लीला गेले. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. दिल्लीत अभ्यास करता करता श्रम विभागात नोकरीदेखील मिळवली.त्यांचे देशसेवा करण्याचे स्वप्न होते.

श्रम विभागात नोकरी करत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु ठेवली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपले स्वप्न पूर्ण केलेय

Success Story
Success Story: नासाची नोकरी सोडली, पतीसोबत UPSC ची तयारी; पाचव्या प्रयत्नात IPS, वाचा अनुकृति शर्मा यांचा प्रवास

इकबाल अहमद यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून जीवन काढले आहे. त्यांनी रोज दिवसरात्र अभ्यास केला. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ते दिल्लीलादेखील गेले होते. त्यानंतर त्यांनी आपल्याला स्वप्नांना पाठलाग केला. नोकरी करता करता त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

Success Story
Success Story: रिक्षाचालकाच्या लेकीची कमाल! UPSC परीक्षेत मिळवली १४२ वी रँक; आता होणार जिल्हाधिकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com