
परिस्थिती कशीही असो तिच्याशी दोन हात केले तर यश मिळतेच. यवतमाळ येथील कळंब चौकात राहणाऱ्या ऑटो चालकाच्या मुलीने यूपीएससीत 142 रँक मिळवली. तर यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शंकर आडे यांच्या मुलगा जयकुमार आडे यांनी देशातून 300 वी रँक घेत यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
एका छोट्या खेड्यातील मुलाने चक्क जिल्हाधिकारी बनण्याकडे झेप घेतली आहे. जयकुमार शंकर आडे असे या तरुणाचे नाव असून त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यातून 1009 यशस्वी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
जयकुमार शंकर आडे यांना 300 वी रँक मिळाली आहे. जयकुमार आडे हे मूळचे नेर तालुक्यातील सोनवाढोणा येथील रहिवासी आहेत. मात्र त्यांचे वडील यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिक्षक असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आडे कुटुंब यवतमाळात स्थायिक आहे. येथील दारव्हा मार्गावरील महावीरनगरमध्ये ते राहतात.वडील शंकर आडे हे लासिना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. तर आई निरुपमा गृहिणी आहेत. शिवाय स्नेहा व अदिती या जयकुमार यांच्या दोन्ही बहिणींचे शिक्षण सुरू आहे.
यवतमाळ शहरातील कळंब चौक परिसरातील ऑटो चालक अश्फाक शाज यांची मुलगी आबेदा आनम हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 142 वी रँक मिळविली आहे. आबेदा हिने शहरातील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील अबाधी इनामदार सिनिअर कॉलेजमधून पदवीचे शिक्षण केले. पुढील शिक्षणासाठी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी येथे गेली. लहानपणापासून तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. या स्वप्नाला सत्यात उतरवत तिने देशातून 142 वी रँक मिळविली.ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांना देत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.