UPSC Result 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा

Archit Dongre Topper In UPSC: यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशात तिसरा आला आहे.
UPSC Exam
UPSC Saam Tv
Published On

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. शक्ती दुबे ही देशातून पहिली आली आहे. दरम्यान, पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आला आहे. अर्चित हा महाराष्ट्रात पहिला आला आहे.अर्चितच्या या यशाने त्याच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे.अर्चितने दिवसरात्र मेहनत करुन हे यश मिळवले आहे.

UPSC Exam
Success Story: भाड्याच्या घरात आयुष्य गेलं, दिवसरात्र मेहनत करुन क्रॅक केली UPSC; IAS अंजली अजय यांना प्रवास

यूपीएससी परीक्षा (UPSC Exam 2025) ही सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट जानेवारी महिन्यात झली होती. यानंतर त्यातील २४१ उमेदवारांची निवड कण्यात येणार होती. एकूण १००९ उमेदवारांची निवड झाली होती. त्यातून आता २४१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

शक्ती दुबेने पहिली रँक मिळवली आहे. यानंतर हर्शिता गोयलने दुसरी रँक तर अर्चितने तिसरी रँक मिळवली आहे. यानंतर शाह मार्गी चिराग याने चौथी रँक मिळवली आहे. आकाश गर्ग याने पाचवी रँक मिळवली आहे. कोमल पुनिया यांने सहावी रँक प्राप्त केली आहे. आयुषी बन्सलने सातवी रँक प्राप्त केली आहे. राज क्रिष्णा झा याने आठवी तर आदित्य विक्रम अग्रवाल याने नववी रँक प्राप्त केली आहे. मयंक त्रिपाठी हे यूपीएससी परीक्षेत देशातून दहावे आले आहेत.

यूपीएससी परीक्षा (UPSC) देऊन प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतात. अशीच मेहनत या सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. त्याचे फळ त्यांना मिळाली.

UPSC Exam
Success Story: हेलिकॉप्टर, फायटर जेट बघायचे..., अखेर ते स्वप्न सत्यात उतरलं, NDA च्या परीक्षेत देशात पहिली आलेला ऋतुजा वऱ्हाडेची यशोगाथा

यूपीएससी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निवड झालेले उमेदवार लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA)मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. येथे आयएएस (IAS) पदासाठी ट्रेनिंग दिले जाते. तर आयपीएस (IPS) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीत ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल.

UPSC Exam
Success Story: नासाची नोकरी सोडली, पतीसोबत UPSC ची तयारी; पाचव्या प्रयत्नात IPS, वाचा अनुकृति शर्मा यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com