Indian Student: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या; कॉलेज जाण्यासाठी बसची वाट पाहत असतानाच दिवसाढवळ्या तरूणीवर गोळीबार

21-Year-Old Indian Student Shot Dead in Canada: कॅनडात शिक्षण घेणाऱ्या एका २१ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
Indian Student
Indian StudentSaam
Published On

कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थीनीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही तरूणी २१ वर्षांची होती. तरूणी घरातून निघाली आणि बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. यावेळी तिच्यासमोरून एक कार गेली. कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यावर अंदाधूद गोळीबार केला. ही गोळी थेट तरूणीच्या छातीत लागली. गोळी लागल्यानंतर ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तात्काळ रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकणारनंतर पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मृत विद्यार्थिनीचे नाव हरसिमरत रंधावा असे आहे. ती कॅनडामधील ओंटारिया येथील रहिवासी आहे. ती कॅनडातील ओंटारियो येथील मेहॉक कॉलेजमध्ये शिकत होती. ती घरातून निघाली होती. नंतर बसची वाट पाहत बस स्टॉपवर उभी होती. या दरम्यान, एक कार आली. दोन गटात अचानक गोळीबार सुरू झाला. दोन वाहनांमधून एकमेकांवर गोळ्या झाडल्या जात होत्या.

Indian Student
Mumbai Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, मुलीला मिठीत घेत अश्लिल कृत्य; VIDEO व्हायरल

याच गोळीबारात एक गोळी हरसिमरत हिच्या छातीत गोळी लागली. ही गोळी लागल्यानंतर ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. हॅमिल्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेचा हरसिमरतशी काहीही संबंध नव्हता. ती निष्पाप होती. दोन टोळीच्या गोळीबारात ती बळी ठरली.

या घटनेबाबत टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 'हरसिमरत रंधावा हिच्या अकावी निधनाची बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्ही तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या कठीण प्रसंगी आम्ही कुटुंबाच्या पाठीशी आहोत'.

Indian Student
Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! संपत्तीच्या वादावरून लहान भावानेच मोठ्या भावाला संपवलं; धारदार शस्त्राने वार अन्..

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या रंगाची कार दिसत आहे. यामधून एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. नंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेत इतर कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com