Mumbai Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टेशनवर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, मुलीला मिठीत घेत अश्लिल कृत्य; VIDEO व्हायरल

Netizens React to Couple's Viral Video on Andheri Station Platform: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही करावं असं म्हणतात. पण प्रेम कुठेही करावं असं कुणी सांगितलं नाही. एका कपलनं रोमान्स करताना सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत.
Viral Video
Viral VideoSaam
Published On

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात. काही जण प्रकाशझोतात येण्यासाठी तर काही लोकांचे नकळत व्हिडिओ व्हायरल होतात. अनेकदा रोमान्स करणाऱ्या कपलचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मध्यंतरी डोंबिवली स्थानकातही एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता मुंबईतील एका रेल्वे स्थानकातला रोमान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा व्हिडिओ अंधेरी स्टेशनमधला असल्याचा दावा करण्यात येत आहे.स्टेशनवरच खुल्लमखुल्ला हे कपल चाळे करताना दिसत आहेत. एका प्रवाशानं त्यांचं हे कृत्य मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपलं आहे.

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही करावं असं म्हणतात. पण प्रेम कुठेही करावं असं कुणी सांगितलं नाही. एका कपलनं रोमान्स करताना सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. अंधेरी रेल्वे स्थानकात हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण काय करतोय, याचं भानच या कपलला राहिलेलं दिसत नाही. आपले हे चाळे कुणी टिपत तर नाही ना, हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं नाही. स्टेशनवर अगदी बिनधास्तपणे रोमान्स करणाऱ्या या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video
Sanjay Raut: 'मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका', संजय राऊत कडाडले

व्हायरल व्हिडिओ अंधेरी स्टेशमचा असल्याची माहिती आहे. या स्टेशनवर एक कपल एकमेकांना बिलगून उभे आहेत. नंतर अश्लील चाळे करत आहेत. भरस्टेशनवर कपल आपले भान हरपून रोमान्स करत आहेत. स्टेशनवरील येणारे जाणारे प्रवासी त्यांच्याकडे पाहत आहेत, तरी देखील एकमेकांना मारलेली घट्ट मिठी काही सोडली नाही. एका प्रवाशाने कपल रोमान्स करत असताना पाहिलं आणि त्याने व्हिडिओ शूट करून व्हायरल केला.

Viral Video
Bhiwandi: मौलवीला मुलाशी संबंध ठेवताना पाहिलं, १७ वर्षीय मुलाचा गळा दाबून हत्या अन् मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरलं; भिवंडी हादरली

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करून संताप व्यक्त केला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. तर, काही नेटकऱ्यांनी यात काहीच आक्षेपार्ह नाही, कपलचे प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com