Success Story: चार वर्षांची तयारी, १२ तासांची मेहनत; IIT टॉपर रमेश सूर्या तेजाची प्रेरणादायी कथा

Success Story On Ramesh Surya Theja: रमेश सूर्या तेजाने केवळ १७व्या वर्षी जेईई मेन्समध्ये २८वा आणि अ‍ॅडव्हान्स्डमध्ये एआयआर २वा क्रमांक मिळवत मेहनतीचं मोठं यश मिळवलं. वयाच्या १३व्या वर्षापासून तयारी करत होता.
Success Story
Success StoryGoogle
Published On

रमेश सूर्या तेजा ही यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी त्याने जेईई परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्याला अपेक्षित यश मिळालं नाही, पण त्याने हार न मानता आपल्या तयारीची रणनीती बदलली. सातत्याने मेहनत घेत, ४ वर्षांच्या अभ्यासानंतर रमेशने पहिल्याच प्रयत्नात जेईई मेन्समध्ये AIR 28 मिळवला. यानंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत त्याने जबरदस्त कामगिरी करत ३६० पैकी ३३६ गुण मिळवत देशात AIR २ मिळवला. त्याची ही कामगिरी त्याच्या चिकाटीची, समर्पणाची आणि योग्य दिशेने घेतलेल्या मेहनतीची साक्ष आहे, जी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

१७ वर्षीय रमेश सूर्या तेजाला जेईई मेनच्या तयारीदरम्यान कठीण टप्प्याचा सामना करावा लागला. जेईई मेनमध्ये AIR 28 आणि अ‍ॅडव्हान्स्डमध्ये AIR 2 मिळवण्याचा रमेश सूर्या तेजाचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. मॉक टेस्टमध्ये तो अनेकदा मागे पडायचा आणि ३०० पैकी पूर्ण गुण मिळवण्यात अपयशी ठरायचा. अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेची भीती वाटायची, पण शिक्षकांनी सतत प्रोत्साहन दिलं. त्या समर्थनामुळे त्याने आत्मविश्वास मिळवला आणि अखेर देशात दुसरा क्रमांक पटकावला. त्याचा हा प्रवास संघर्ष व जिद्दीचं प्रतीक आहे.

Success Story
Success Story: हेलिकॉप्टर, फायटर जेट बघायचे..., अखेर ते स्वप्न सत्यात उतरलं, NDA च्या परीक्षेत देशात पहिली आलेला ऋतुजा वऱ्हाडेची यशोगाथा

माहितीनुसार रमेश सूर्या तेजाने सांगितले की, माझे मॉक टेस्टचे गुण ३०० पैकी ३०० येत नव्हते, जेव्हा इतर विद्यार्थी तेवढे गुण मिळवत होते. पण आमचे शिक्षक आम्हावर दबाव न आणता आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि सतत प्रोत्साहित केलं. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि मी मनापासून मेहनत केली. त्या पाठबळामुळेच यश मिळालं.

Success Story
Success Story: जिद्द! तिनदा UPSC क्रॅक पण मुलाखतीत फेल; हार नाही मानली; चौथ्या प्रयत्नात IAS झाला; महाराष्ट्राच्या लेकाची यशोगाथा वाचा

जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या तयारीबाबत रमेश सूर्या तेजा म्हणला, मला माहित होतं की मी रसायनशास्त्रात मागे आहे, म्हणून मी त्यावर अधिक मेहनत घेतली. परीक्षेला जाताना मी निकाल किंवा भविष्याचा विचार न करता फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं, जे माझ्यासाठी फायद्याचं ठरलं. रमेश मागील ४-५ वर्षांपासून दररोज १२ ते १३ तास अभ्यास करत होता. त्याला त्याच्या मोठ्या भावाकडून प्रेरणा मिळाली, जो सध्या आयआयटी-बीएचयूमध्ये अंतिम वर्षात शिकत आहे.

Success Story
Success Story: १६ सरकारी नोकऱ्या धुडकावल्या; पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS तृप्ती भट्ट आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com