
सिंधुदुर्गमध्ये भीषण अपघातामध्ये तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डंपरने या दोघांना चिरडलं. हा अपघात मुंबई- गोवा महामार्गावर हुमरमळा येथे झाला. डंपर ओरोसवरून कुडाळच्या दिशेने जात होता. डंपरने धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महमार्गावर वाहतूक कोंडी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अनुष्का माळवे राहणार अणाव आणि विनायक निळेकर राहणार रानबांबुळी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनुष्का आणि विनायक हे दोघेही मुंबई- गोवा महामार्गावरून बाईकने प्रवास करत होते. त्याच वेळी त्यांच्यासमोर कारला अपघात झाला. कारला अपघात झाल्यामुळे दोघेही थांबले.
बाईक बाजूला लावून अनुष्का आणि विनायक हा कार अपघात पाहत होते. त्याचवेळी भयंकर घडलं. मागून येणाऱ्या डंपरने दोघांनाही जोरदार धडक दिली. या धडकेत अनुष्का आणि विनायक यांचा जागीच मृत्यू झाला. ओरोसकडून कुडाळच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा कारने लाईटच्या खांबाला धडक दिली या कारमधून प्रवास करणारे १० जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अनुष्का आणि विनायक हे दोघेही याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी सिंधुदुर्ग नगरी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास पोलिस करत आहेत. कार अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यामधील काहींची प्रकृती गंभीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.