Kalyan Accident : कल्याणमध्ये अपघाताचा भीषण थरार; मद्यधुंद कारचालकाने ६-७ वाहनांना उडवलं

Kalyan Accident update : कल्याणमध्ये अपघाताचा भीषण अपघात झालाय. मद्यधुंद कारचालकाने ६-७ वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे.
kalyan accident News update
kalyan accident News Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाने रस्त्यावरील ६ ते ७ वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. मद्यधुंद कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारची दोन कारसह चार ते पाच दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला पकडून चोपलं. त्यानंतर या कारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या अपघातामुळे बिर्ला रोड रस्त्यावर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

kalyan accident News update
Shoking News : भयंकर! आधी 400000 रुपये लुबाडले, मग पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी अनिश पटेल यांनी सांगितलं की, 'चुकीच्या मार्गावरून गाडी आली. ही गाडी आधी डंपरला धडकली. त्यानंतर एका स्कुटीला धडकली. या कारचालकाने जवळपास ५ वाहनांना उडवलं. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी या कारचालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याची शक्यता आहे'.

kalyan accident News update
Shocking News : हेअर ट्रान्सप्लांट करताना आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू; त्याच डॉक्टर तरुणीकडून भयंकर उपचार
kalyan accident News update
Nashik Crime : खबऱ्यांनी डाव साधला, माहिती देऊन गेम केला; 2 कोटींचा माल लंपास, नेमकं काय घडलं?

दुसऱ्या व्यक्तीने अपघाताचा थरार सांगितला. 'मद्यधुंद कारचालकाने दुभाजलाका धडक दिली. आम्ही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कारकाचलकाने आमच्या वाहनांना धडक दिली. या धडकेत माझ्या कारमधील महिला जखमी झाली आहे. तर मलाही किरकोळ दुखापत झाली आहे. आमच्या कारमध्ये एकूण चार जण होते, असे दुसऱ्या कारचालकाने माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com