Nashik Crime : खबऱ्यांनी डाव साधला, माहिती देऊन गेम केला; 2 कोटींचा माल लंपास, नेमकं काय घडलं?

Nashik Crime update : नाशिकमध्ये खबऱ्यांनी डाव साधल्याची घटना घडली आहे. खबऱ्यांनी माहिती देऊन गेम केलाय. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? वाचा
nashik crime
nashik crime news Saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : नाशिकमध्ये चक्क अन्न आणि औषध प्रशासनाचे खबरीचं लुटारू निघाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एफडीएच्या या खबऱ्यांनी स्वतःला एफडीए अधिकारी सांगत सुपारी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांची लूट केल्याचं समोर आलं आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता सुपारीने भरलेले ट्रक चक्क एफडीएच्या नाशिक कार्यालयातील आवारातच जमा करून घेतल्याचंही उघडकीस आलं आहे.

नाशिकच्या एफडीए कार्यालयाच्या आवारात उभे असलेले सुपारीने भरलेले २ ट्रक खऱ्या खुऱ्या एफडीए अधिकाऱ्यांनी नव्हे तर चक्क तोतया एफडीए अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. विशेष म्हणजे हे ट्रक कुणी जप्त केले, याची नाशिकच्या एफडीए अधिकाऱ्यांनाही माहिती नव्हती. एफडीएच्या अधिकाऱ्यांना ९ मे रोजी संशयास्पद सुपारीच्या वाहतुकीची टीप दिली. या टीपनंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी येवलाच्या निफाड रस्त्यावर सापळा रचला. २ ट्रकमधील तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीची ५८ हजार किलो सुपारी जप्त केली.

nashik crime
लातूरमध्ये वादळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; वीज पडून जनावरांचे गोठे जळाले

सुपारीने भरलेले हे दोन्ही ट्रक एफडीए अधिकाऱ्यांनी नाशिकच्या एफडीए कार्यालयाच्या आवारात आणले गेले. मात्र दुसऱ्या दिवशी २ ऐवजी ४ सुपारीचे ट्रक कार्यालयाच्या आवारात उभे असल्यानं घडलेल्या प्रकाराचं बिंग फुटलं. एफडीए अधिकाऱ्यांनी तर आम्ही फक्त २ ट्रकवर कारवाई केल्याचं सांगत अन्य २ ट्रकवर कुणी कारवाई केली, याची माहिती नाही, असं सांगत अधिकाऱ्यांनी हात झटकले.

nashik crime
Mumbai Politics : मुंबई आणि गावातही मतदान कार्ड, सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

एफडीए अधिकाऱ्यांनी हात झटकत असले तरी जप्त करण्यात आलेल्या ट्रकचे चालक एफडीए अधिकाऱ्यांनी ट्रक जप्त करून आणले. आमचे मोबाईल फोन, ट्रकच्या चाव्या, पैसे सर्व हिसकावून घेतलं, यावर ठाम असल्यानं अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी तातडीनं तपास करत ३ तोतया एफडीए अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर जे समोर आलं त्याने सर्वांनाच धक्का बसला.

nashik crime
Maharashtra Politics : 'आमची ट्रेन सुस्साट'; CM देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला, VIDEO

नेमकं काय घडलं?

एफडीएच्या खबऱ्यांनी ९ मे रोजी संशयास्पद सुपारीची ट्रकमधून वाहतूक होत असल्याची टीप अधिकाऱ्यांना दिली. खबऱ्यांच्या टीपनंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी निफाडच्या येवला रस्त्यावर सापळा रचला. त्यानंतर सुपारीची वाहतूक करणारे २ ट्रक पकडले. या २ ट्रकमध्ये अडीच कोटी रुपये किंमतीची ५८ हजार किलो सुपारी होती. दोन्ही ट्रक एफडीए अधिकाऱ्यांनी नाशिकच्या एफडीए कार्यालयाच्या आवारात उभे केले. मात्र खबऱ्यांनी संशयास्पद सुपारीच्या वाहतुकीची केवळ एकच टीप एफडीए अधिकाऱ्यांनी दिली, दुसरी टीप लपवली.

एफडीए अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी येवला टोल नाक्यावर एफडीए अधिकारी असल्याचं सांगून सुपारीचे आणखी २ ट्रक पकडले. ट्रक चालकांना कारवाईची भीती दाखवून त्यांना नाशिकच्या एफडीए कार्यालयाच्या आवारात आणण्यात आलं. त्यानंतर ट्रक चालकांकडून त्यांचे मोबाईल, ट्रकच्या चाव्या, बिलांच्या पावत्या आणि रोख रक्कम घेऊन हे तोतया अधिकारी पसार झाले.

nashik crime
Cyclone Shakti Alert : भारतावर नवं संकट घोंघावतंय; 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, हवामान विभागाने काय इशारा दिला?

दरम्यान, सगळ्या प्रकारामुळे एकूणच एफडीएच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी कारवाई केलेले ट्रक दोनाचे चार झाले, तरी याबाबत पोलीस अथवा आरटीओ विभागाला कळवण्याची तसदी अधिकाऱ्यांनी का घेतली नाही? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com