Cyclone Shakti Alert : भारतावर नवं संकट घोंघावतंय; 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Cyclone Shakti Alert update : भारतावर नवं संकट घोंघावत आहे. 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Cyclone Shakti Alert
Cyclone Shakti Saam tv
Published On

Cyclone Shakti : भारतात ऐन उन्हाळ्यात समुद्रात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. भारताला आणखी एक चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील आढवड्यात बंगाल उपसागरात नवीन शक्ती चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दुसरीकडे दक्षिण अंदमान सागर, निकोबार द्विप समूह, बंगाल उपसागर आणि उत्तर अंदमान सागराच्या दक्षिण-पश्चिमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले आहेत.

Cyclone Shakti Alert
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवप्रेमींकडून जाळपोळ, परिसरात तणाव

मीडिया रिपोर्टनुसार, हवामान विभागाच्या माहितीनसुरा, अंदमान सागरावर हवेत चक्राकार वारे दिसून आले आहेत. यामुळे १६ मे ते २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. २३ मे ते २८ मेपर्यंत ही प्रणाली आणखी शक्तिशाली होऊन चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वादळाला 'शक्ती' नाव दिले जाऊ शकते. याबाबत हवामान विभागाने अधिकृत माहिती दिली आहे.

Cyclone Shakti Alert
bjp minister controversy : भाजप सरकारचा बडा नेता गोत्यात; कर्नल सोफिया कुरैशींवरील वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल

हवामान विभागाच्या निवेदनानुसार, १४ मे २०२५ रोजी ३.०० युटीसी वाजता तामिळनाडूच्या किनाऱ्यापासून नैऋत्य बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर वरच्या हवेतील चक्राकार वारा तयार झाला आहे. हवामान विभागाने पुढे म्हटले की, '१६ मे आणि १७ मे रोजी नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोकण क्षेत्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

चक्रीवादळ आल्यास त्याचा परिणाम ओडिशापासून बंगालपर्यंत दिसून येईल. तज्ज्ञांनी २३ मे २८ मेदरम्यान बंगालच्या उपसागरात 'शक्ती' चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाने या वादळाबाबत दुजोरा दिलेला नाही.

Cyclone Shakti Alert
Jaisalmer Car Video: तरूणीने मर्यादा ओलांडल्या...रस्त्यात कार थांबवली, म्हाताऱ्यासोबत नको ते केलं, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ

या चक्रीवादळामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे क्षेत्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com