लातूर : लातूर (Latur ) जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रेणापूर शहर आणि पानगांव परिसरात प्रचंड वादळासह विजांचा कडकडाटासह अर्धा तास पाऊस (Rain) झाला. या तुफान पावसामुळं फावडेवाडी येथे वीज पडून जनावरांच्या गोठ्यांना आग लागून गोठे जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कडब्याच्या बनिम व गुरांचा चारा म्हणून जतन करून ठेवलेले सोयाबीन व हरभऱ्याचे गुळी जळून खाक झाले आहेत. यामुळे या गावातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झाले आहेत. ( Latur Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
लातूर जिल्ह्यातील रेणापूर रेणापूर तालुत्यातील पानगाव आणि रेणापूर कारेपुर रस्त्यावर सायंकाळी ५ वाजता अर्धा तास वादळासह विजांच्या कडडाटासह तुफान पाऊस बरसला. त्यामुळं गावातील झाडेही उन्मळून पडली आहेत. तर तालुक्यातील मोहगाव येथील एका शेतकऱ्याची पपईची बाग पूर्णणे मोडून पडली आहे. या तुफान पावसामुळं फावडेवाडीत जनावरांच्या गोठ्याला आग लागली. कडब्याचा बनिब, गुरांचा चारा, जतन केलेले सोयाबीन, हरभऱ्याचे गुळी जळून खाक झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झाले आहे. फावडेवाडीतील गोठ्याला लागलेली आग विझविण्याकरिता अग्नीशमनची गाडी दाखल झाली आहे. दरम्यान, फावडेवाडीत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विजपुरवठा खंडीतच होता.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर रेणापूर तालुत्यातील पानगाव, फावडेवाडीत कोसळलेल्या तुफान पावसामुळं काही शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या गोठ्यावर वीज पडून आग लागली. या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. या पावसामुळे माणीक केंद्रे, ज्ञानोबा केंद्रे, तुकाराम केंद्रे, दयाराम केंद्रे, कुंडलीक सिरसाट, नारायण केंद्रे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.