Milk Adulteration : तुम्ही पिताय त्या दुधात केमिकल लोच्या! डेअरीवर धाड टाकल्यानंतर दृश्य बघून FDA अधिकारी चक्रावले

Fake Milk Factory Busted in Pandharpur : राज्यात अनेक ठिकाणी दुधाच्या भेसळीच्या घटना समोर येत आहेत. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.
Milk Adulteration
Milk AdulterationSaam tv
Published On

पंढरपूर : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक दैनंदिन आहार वेळेवर घेत नाहीत. मिळेल ते खाणे आणि अपुऱ्या पोषणमूल्यांच्या आहारामुळे शरीरातील कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता वाढत आहे. त्यामुळे हाडे कमकुवत होणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. डॉक्टर तसेच गावातील आजी-आजोबा देखील दूध पिण्याचा सल्ला देतात, मात्र हेच दूध जर भेसळयुक्त असेल तर आरोग्यास गंभीर धोका ठरू शकते.

असाच काहीसा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आला आहे. तालुक्यातील करकंब येथे बनावट दुधाचा कारखाना उघडकीस आला असून, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त केला आहे.

Milk Adulteration
Crime News: दाजीच्या डोक्यात सैतान घुसला, मित्रांना घेऊन मेहुणीवर बलात्कार केला; नंतर जे केलं ते कहरच..

केमिकलयुक्त दुधाचा गोरखधंदा उघडकीस

पंढरपूरजवळील सुगाव भोसे येथे दत्तात्रय जाधव गेल्या अनेक वर्षांपासून बनावट दूध तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार करकंब पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला. या कारवाईत पाम ऑइल आणि दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Milk Adulteration
Maha Kumbh 2025: कुंभमेळ्यात डिजिटल स्नानाचा नवीन ट्रेंड! घरबसल्या 'एवढ्या' रुपयांमध्ये कुंभस्नान

यापूर्वीही दाखल आहेत गुन्हे

मुख्य आरोपी दत्तात्रय जाधव हा पशुवैद्यक असून, यापूर्वी तीन वेळा त्याच्यावर केमिकलयुक्त दूध तयार करून विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, प्रत्येक वेळी तो जामिनावर सुटत होता आणि पुन्हा हा गोरखधंदा सुरू करत होता.

पोलीस आणि अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाची कारवाई

या छाप्यात पोलिसांनी तब्बल 17 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत करकंब पोलिसांसह अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

एका बाजूला दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही आणि दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ही भेसळ फक्त व्यवसायामधली नसून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. त्यामुळे सरकारने यावर कठोर कायदा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com