Crime News: दाजीच्या डोक्यात सैतान घुसला, मित्रांना घेऊन मेहुणीवर बलात्कार केला; नंतर जे केलं ते कहरच..

Crime Against Women and killed: मित्रांना घेऊन दाजीनं मेहुणीवर बलात्कार केला. नंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जाळण्यात आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

आधी २१ वर्षीय मेहुणीवर दाजीने बलात्कार केला. नंतर त्याच्याच दोन मित्रांनी लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जाळण्यात आला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, २ आरोपी अद्याप फरार आहे.

आमिष दाखवून सामूहिक बलात्कार

पोलिस अधीक्षक आदित्य बन्सल यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबाने २३ जानेवारी रोजी तिच्या बेपत्ता होण्याबाबत एफआयआर दाखल केला होता. तपासात आशिषचे मुलीशी अवैध संबंध होते ही बाब उघडकीस आली. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता.

बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, आशिषने शुभम आणि दीपक यांच्यामदतीने मुलीला फसवले आणि नंतर तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपीने मुलीचा गळा दाबून हत्या केली.

Crime News
Kalyan News: कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे

हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आला

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपीने मुलीचा मृतदेह जाळून टाकला. तपासाच्या आधारे, आशिषला अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Crime News
Maharashtra Politics: 'मविआच्या सरपंचांना निधी मिळणार नाही', भाजपच्या मंत्र्यांचं मोठं विधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीराचे जळालेले अवशेष सापडले आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com