Maharashtra Politics: 'मविआच्या सरपंचांना निधी मिळणार नाही', भाजपच्या मंत्र्यांचं मोठं विधान

Maharashtra Village Funding Politics: 'ज्या गावात ठाकरे गटाचा सरपंच असेल, त्या गावाला निधी देणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजपच्या मंत्र्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
BJP
BJPSaam Tv News
Published On

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 'ज्या गावात ठाकरे गटाचा सरपंच असेल, त्या गावाला निधी देणार नाही, असं मोठं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

तसेच पक्षातून निवडणुकीपूर्वी गेलेली घाण पुन्हा पक्षात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असं घणाघातही यावेळी त्यांनी केला आहे.

'सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटन मेळ्याव्यात नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'ज्या गावात ठाकरे गटाचा सरपंच असेल, त्या गावाला निधी देणार नाही. एप्रिलनंतर यादीच घेऊन बसणार. मग त्यांना कळेल आपण किती मोठी चुक केली आहे. कितीही टीका करा. मी पक्ष वाढवणार. माझ्या नेत्यांना स्पष्टीकरण देईन. पण निधी देणार नाही', असं नितेश राणे म्हणाले.

BJP
Chhatrapati Sambhaji Maharaj: संभाजी राजेंच्या कन्येबाबत माहीत नसलेल्या १० रंजक गोष्टी

महायुतीचा सरपंच नाही, तर निधी नाही

'ज्या गावात भाजप, महायुतीचे सरपंच नाही. त्यांना निधी नाही. पक्ष वाढवायचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी बसलो आहोत. जेव्हा मविआचं सरकार होतं. तेव्हा आमच्या याद्या फेकून द्यायचे. सगळी कामं नाकारली, निधी दिला नाही'.

'महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले आहेत. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकलं. आता कर्जाची परतफेड होणार तेही व्याजासह करणार', अशा शब्दात त्यांनी मविआला इशारा दिलाय.

BJP
Railway Video: लोकलच्या दारावर उभा होता, तोल गेला खाली पडला; जवानानं वाचवलं, थरार कॅमेऱ्यात कैद

पुन्हा बाहेरची घाण नकोच

तसेच राजन तेली आणि विशाल परब यांचं नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी निशाणा साधला आहे. 'सावंतवाडी मतदारसंघात पुन्हा बाहेरची घाण नकोच. आमच्या नेत्यांवर टीका करत काही जणांनी पक्ष सोडला आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. राणेंच्या विरोधात आपण कसं बोलतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आमच्या प्रमुखांची कुणी बदनामी करत असेल तर खपवून घेणार नाही. त्यांना आता सोडायचं नाही. ते पुन्हा पक्षात येण्याचं धाडस करणार नाही, आणि केलं तर त्यांना सोडू नका, असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com