Chhatrapati Sambhaji Maharaj: संभाजी राजेंच्या कन्येबाबत माहीत नसलेल्या १० रंजक गोष्टी

Bhagyashree Kamble

छावा

'छावा' सिनेमातून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.

Maharaj | Social

भवानीबाई

चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची कन्या अर्थात भवानीबाई यांचीही चर्चा होत आहे.

Bhavani Bai 1 | Social

जन्म

भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर १६७८ साली श्रृंगारपूर पिलाजी राजेशिर्के यांच्या वाड्यात झाला होता.

Bhavani Bai 2 | Social

विवाह

भवानीबाई यांचा विवाह महाडिक कुटुंबात हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्यासोबत झाला होता.

Maharaj | Social

निधन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर राजकन्या भवानी बाई यांचे काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Bhavani Bai 3 | Social

औरंगजेबाच्या कैदेत

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई आपल्या मातोश्री महाराणी येसूबाई आणि धाकटे बंधू शाहू महाराजांसोबत औरंगजेबाच्या कैदेत होत्या.

Maharaj | Social

शंकराजी राजे महाडिक

शंकराजी राजे महाडिक यांनी जिंजीचा किल्ला स्वराज्यात राहावा म्हणून मोठे प्रयत्न केले होते. शाहू महाराजांनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद आणि महाडिकांना मोठी मान्यता दिली होती.

Raje Mahadik | Social

सती

भवानी बाई यांना दुर्गोजी आणि अंबाजी हे दोन पुत्र होते. पती शंकराजींच्या मृत्यूनंतर भवानीबाई सती गेल्या होत्या.

Sati | Swarajya Rakshak

समाधी

तारळे गावातील तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती भवानीबाईंची समाधी आहे.

Samadhi | Swarajya rakshak

वाडा

भवानीबाई यांचा ऐतिहासिक वाडा पाटण तालुक्यात असलेल्या तारळे गावात आहे.

Bhavani Bai | Social

NEXT: छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घ्या 10 रंजक गोष्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharaj | Social
येथे क्लिक करा