Bhagyashree Kamble
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला होता. महाराजांच्या आईसाहेबांचं निधन झाल्यानंतर जिजाऊ साहेबांनी त्यांचा सांभाळ केला होता.
वयाच्या १८ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे युवराज तर, २३ व्या वर्षी छत्रपती झाले होते.
चौदाव्या आणि पंधराव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांनी साहित्य आणि कवितेत रस घेतला होता.
तसेच याच काळात ते संस्कृत पंडित झाले होते. बुधभूषणम या संस्कृत ग्रंथासह त्यांनी इतर भाषेतले ३ ग्रंथही लिहिले होते.
१६ जानेवारी १६८१ साली रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला होता.
दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाला वाटले की तो आता सहजरित्या रायगड किल्ला काबीज करेल.
पण औरंगजेबाने जेव्हा रायगडावर हल्ला चढवला, तेव्हा तो छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून पराभूत झाला होता.
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते पराभूत झालेले नाहीत.
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी भरपूर कामे केली आहेत. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून त्यांनी मंदिर उभारले होते.
छत्रपती संभाजी महाराज यांनी कायमच अन्यायाविरूद्ध आवाज उठवला आहे. गोरगरीब, स्त्रियांवर झालेल्या अन्यायांवर त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांचे धाडस हे हिमालयापेक्षाही मोठे होते.