Railway Video: लोकलच्या दारावर उभा होता, तोल गेला खाली पडला; जवानानं वाचवलं, थरार कॅमेऱ्यात कैद

Mumbai Train Commuter Falls Rescued: धावत्या लोकलमधून प्रवासादरम्यान तोल जाऊन प्रवासी खाली पडला. त्याचे प्राण वाचवण्यात जवानांना यश आलं आहे. थरार कॅमेऱ्यात कैद.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam Tv News
Published On

धावत्या लोकलमधून प्रवासादरम्यान तोल जाऊन प्रवासी खाली पडला. जवानांच्या सर्तकतेमुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. ही धक्कादायक घटना अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर घडली आहे. जवानांनी प्रवाशाचा जीव वाचवल्यामुळे आरपीएफकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास चर्चगेटसाठी निघालेल्या जलद लोकलमधून प्रवासी पडला. लोकल गाडी प्लॅटफॉर्मवरून निघाली. तेव्हा एका व्यक्तीचा अचानक तोल गेला. तोल गेल्यामुळे प्रवासी खाली पडला.

लोकल रेल्वेनं वेग घेतल्यामुळे लोकल सुसाट पळाली. या दरम्यान, फलाटामधील अंतरावर प्रवासी पडत असताना त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ जवानांनी धाव घेतली. तसेच आपला जीव धोक्यात घालून प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत.

एमएसएफ कर्मचारी हनुमंत शिंदे आणि संदीप मराठे असे कर्तव्यावर असलेल्या जवानांचे नाव आहे. प्रवाशाचे सर्तकतेनं प्राण वाचवल्यामुळे आरपीएफकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com