Kalyan News: कल्याण डोंबिवलीत पार्किंग ठरतेय डोकेदुखी, दरवर्षी शहरात लाखो वाहनांची भर, केडीएमसीचे वाहनतळे अपुरे

Kalyan Traffic and Parking News: शहरात लाखभर वाहनांची भर पडत असताना नियोजनाअभावी वाहनांसाठी पार्किंगची समस्या आता नागरिकांना भेडसावत आहे. यामुळे नागरीक त्रस्त आहेत.
Kalyan News
Kalyan NewsSaam Tv News
Published On

दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक दुचाकी किंवा चारचाकी घेतात. विविध शहरात लाखभर वाहनांची भर पडते. अशातच कल्याण आरटीओ परिक्षेत्रात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.

वाहनं उभी करण्यास सोसायटीत जागा नाही तर केडीएमसीचे वाहनतळ फुल झाले आहेत. रस्त्यावर वाहनं पार्क केली तर, वाहतूक पोलीस कारवाई करतात. त्यामुळे गाड्या पार्किंग करायच्या कुठे? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झालाय.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात डिसेंबर २०२४ अखेर १४ लाख ६५ हजार १९४ वाहनांची नोंद झाली होती. यामधील कल्याण डोंबिवलीतील जवळपास ७ लाख म्हणजेच निम्म्या वाहनांची नोंद झाली होती. शहरात लाखभर वाहनांची भर पडत असताना नियोजनाअभावी वाहनांसाठी पार्किंगची समस्या आता नागरिकांना भेडसावत आहे.

Kalyan News
Maharashtra Politics: 'मविआच्या सरपंचांना निधी मिळणार नाही', भाजपच्या मंत्र्यांचं मोठं विधान

काही नागरीकांना सोसायटी किंवा वाहनतळावर पार्किंगची जागा मिळाली नाही, की ते थेट रस्त्याच्या कडेला वाहन उभे करतात. पण वाहन चोरीला जाण्याचीही भीती असते. रस्त्याच्या कडेला उभे केलेले वाहनांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई देखील केली जाते. केडीएमसीने याबाबत नियोजन करून तात्काळ पार्किंग समस्या मार्गी लावावी, अशी मागणी आता वाहन चालकांकडून केली जात आहे.

Kalyan News
Chhatrapati Sambhaji Maharaj: संभाजी राजेंच्या कन्येबाबत माहीत नसलेल्या १० रंजक गोष्टी

याबाबत केडीएमसी चे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी सांगितले की ,शहरात सहा ठिकाणी केडीएमसीकडून वाहनतळ उभारण्यात आली आहेत .इतर प्रस्तावित ठिकाणी लवकरच वाहनतळे सुरू करण्यात येतील .तसेच पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर शहरात पार्किंग धोरण निश्चित करत अंमलबजावणी सूरु करण्यात येईल, असे क्या सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com