AI Technology : एआय तंत्रज्ञानामार्फत होणार पंढरपूर यात्रेतील गर्दीचे मॅनेजमेंट; संगणक प्रणालीसाठी दोन कोटींचा प्रस्ताव

Pandharpur News : पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी एक कोटी भाविक येत असतात. तर पंढरपूरची सर्वात मोठी यात्रा असलेल्या आषाढी वरील मानाच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकीसह चार मोठ्या यात्रा भरत असतात. या यात्रेनिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी पंढरपूरमध्ये दाखल होत असते. प्रामुख्याने आषाढीला १५ ते १६ लाख भाविक पंढरपूरला दर्शनासाठी येत असतात. यामध्ये प्रामुख्याने विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात लाखो भाविकांची गर्दी असते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे. 

पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी एक कोटी भाविक येत असतात. तर पंढरपूरची सर्वात मोठी यात्रा असलेल्या आषाढी वरील मानाच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. दशमी आणि एकादशीच्या दिवशी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागा वाळवंटामध्ये लाखो भाविक असतात. भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी यात्रेच्या तीन महिने अगोदरच प्रशासनाच्या वतीने तयारी केली जाते. त्यानुसार कार्तिकी यात्रेला देखील गर्दी जमत असते. 

Pandharpur News
NAFED Center : शासकीय खरेदी केंद्रावर पुन्हा बारदान तुटवडा; सोयाबीनचे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बंद

सुरक्षित गर्दी व्यवस्थापन 
प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यासाठी आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी चालणारी गर्दी, बसलेली गर्दी आणि उभे राहिलेली गर्दी याचे नियोजन केले जाणार आहे. सध्या यात्रा काळामध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत गर्दीचे व्यवस्थापन केले जाते. आता मात्र एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व विभागांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. 

Pandharpur News
Shahapur Police : आसनगावजवळ ६ किलो गांजा जप्त; शहापूर पोलिसांकडून एकजण ताब्यात

शासनाकडे दोन कोटींचा प्रस्ताव 

एआय तंत्रज्ञानामार्फत सॅटॅलाइट, इंटरनेट, जीपीएस सिस्टीम, व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही आणि मानवी व्यवस्थापन सर्व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र केले जाणार आहे. हे एआय तंत्रज्ञान तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून शासनाकडे दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. याचा पुढील शेकडो वर्ष यात्रा व्यवस्थापनासाठी फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com