Shoking News : भयंकर! आधी 400000 रुपये लुबाडले, मग पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

Shoking News in Marathi : शिक्षकाला लुटल्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
madhya pradesh
Shoking News Saam tv
Published On

मध्य प्रदेशच्या दमोह येथून खळबळजनक घटना समोर आली आहे. हटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिक्षकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षकाला लूटल्यानंतर त्याला जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश कुमार त्रिपाठी असे प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. राजेश कुमार हे सुनवाहा भागात राहत होते. राजेश कुमार हे उशिरा रात्री दुचाकीवरून हटा येथून सुनवाहाला निघाले होते. त्यावेळी लुटारूंनी शिक्षकाला थांबवलं. त्यांच्याजवळ एकूण ४ लाख रुपये होते. लुटारूंनी त्यांच्याजवळील ४ लाख रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर शिक्षकाला मारहाण केली.

madhya pradesh
Mumbai Politics : मुंबई आणि गावातही मतदान कार्ड, सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

लुटारूंनी पुढे त्यांच्याजवळील पेट्रोल शिक्षकाच्या अंगावर टाकलं. लुटारूंनी शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. या घटनेत शिक्षक राजेश यांचा मृत्यू झाला. मृत शिक्षकाचा भाऊ मुकेश त्रिपाठी यांनी सांगितलं की, 'शिक्षकाचे वाडवडील सुनवाहा गावात राहत होते. या गावात त्यांची जमीन आहे. हटा येथून त्यांचे भाऊ सुनवाहा येथे चालले होते. याचदरम्यान त्यांच्यासोबत भयंकर प्रकार घडला.

madhya pradesh
Maharashtra Politics :...तर त्यांची व्यवस्था करू; भाजप खासदार मेधा कुलकर्णींना धमकी? राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, लुटारूंच्या कृत्यानंतर शिक्षकाने फोन करून कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयातील सदस्य घरी पोहोचले, तरीही आग विझली नव्हती. शिक्षक राजेश कुमार पाणी मागत होते. शिक्षकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासात पुरावे आढळतील, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

madhya pradesh
Shocking News : हेअर ट्रान्सप्लांट करताना आणखी एका इंजिनीअरचा मृत्यू; त्याच डॉक्टर तरुणीकडून भयंकर उपचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाची हत्या करणाऱ्या लुटारूंनी लवकरच अटक केली जाईल. घटनास्थळाच्या आसपासच्या लोकांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. पुराव्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com