Nagpur Bogus Teacher Scam: नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांचे निलंबन

Nagpur Police: नागपूरमधील बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक निलेश मेश्राम यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Nagpur Bogus Teacher Scam: नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांचे निलंबन
Nagpur Bogus Teacher ScamSaam Tv
Published On

नागपुरमधील शिक्षण भरती घोटाळ्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी अखेर शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांना निलंबित करण्यात आले आहे. नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या १५ दिवसानंतर निलंबनाचे आदेश निघाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक निलेश मेश्राम यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अटेकनंतर ४८ तासांत ही कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र १५ दिवस लोटल्यावर ही कारवाई करण्यात आली.

Nagpur Bogus Teacher Scam: नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांचे निलंबन
Nagpur Crime: पैशांचा पाऊस पाडतो फक्त..., नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शासनाने उल्हास नरड आणि निलेश मेश्राम यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्याचबरोबर उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर यांच्याही निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहे. उपसंचालक कार्यालयातील दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे उल्हास नरड यांचा शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला.

Nagpur Bogus Teacher Scam: नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांचे निलंबन
Kolhapur-Nagpur Flight: अंबाबाईचं दर्शनाला जायचंय? फक्त ९०मिनिटात नागपूरवरून गाठा कोल्हापूर

तर निलेश मेश्राम यांचा प्रभार हरडे यांच्याकडे देण्यात आला. प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार गौतम गेडाम यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान, सध्या राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली.

Nagpur Bogus Teacher Scam: नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांचे निलंबन
Nagpur Accident : लग्नसमारंभ आटोपून येताना ट्रकने दुचाकीला चिरडलं, काकू-पुतण्याचा मृत्यू, ४ वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com