Nagpur Crime: पैशांचा पाऊस पाडतो फक्त..., नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Godman and Accomplices Arrested for Assault on Minors: नागपूरमध्ये ३ अल्पवयीन मुलींवर भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना पोलिसांनी अटक केली.
Nagpur Crime: पैशांचा पाऊस पाडतो फक्त..., नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Nagpur Crime NewsSaam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये भोंदूबाबाने ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशाचा पाऊस पाडतो, त्यासाठीच्या पूजेसाठी ३ अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून एका भोंदूबाबाने भयानक कृत्य केले आहे. या भोंदूबाबाने तिन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबा यासह एकूण ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अब्दुल कुरैशी उर्फ कंदील बाबाने नागपुरात काही जणांना पैशाचा पाऊस पाडणे शक्य आहे त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल. या पुजेसाठी ३ अल्पवयीन मुली लागतील. तसंच, तिन्ही मुलींना पूजेच्या वेळेला नग्नावस्थेत बसावे लागेल अशी बतावणी केली होती. त्यानंतर पैशांच्या लालचेपोटी आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली. काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदूबाबाने तिन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले.

Nagpur Crime: पैशांचा पाऊस पाडतो फक्त..., नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Shirdi Crime : ऑनलाईन बुकिंग करून हॉटेलवर गैरकृत्य; पोलिसांची धाड टाकत कारवाई, महिलेची सुटका तर दोघेजण ताब्यात

आरोपी भोंदूबाबाने तिन्ही मुलींना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने एक एक करत तिन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. भोंदूबाबाच्या या कृत्यानंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही. मात्र तिन्ही मुलींना त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत समजले. एका ओळखीच्या व्यक्तीच्या मार्फत तिघींनी नागपुरच्या मानकापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या घटनेमुळे नागपुरमध्ये एकच खळबळ उडाली.

Nagpur Crime: पैशांचा पाऊस पाडतो फक्त..., नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Kolhapur Crime : चौघांनी घेरलं, कपडे काढून रॉड अन् काठ्यांनी बेदम मारलं; कोल्हापूरमध्ये तरुणाला विवस्त्र केलं

त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबा अब्दुल कुरेशीसह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्यामुळे या भोंदूबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.

Nagpur Crime: पैशांचा पाऊस पाडतो फक्त..., नागपूरमध्ये भोंदूबाबाकडून ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
Crime News : दुकानाची उधारी मागितल्याने गावात धुडगूस; हवेत गोळीबार करून दुकान, मोटारसायकलची तोडफोड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com