RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याचा गैरवापर; रायगड जिल्ह्यात पालकांनी जोडले बोगस पुरावे

Raigad news : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये शाळेत २५ टक्के जागा राखीव करून त्या जागांवर लॉटरी पद्धतीने नंबर लागलेल्या मुलांना मोफत प्रवेश दिले जात असतात
RTE Admission
RTE AdmissionSaam tv
Published On

सचिन कदम 
रायगड
: गोरगरिबांच्या मुलाना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे; यासाठी शिक्षण हक्क कायदा आणण्यात आला. मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात आपल्या मुलांना २५ टक्के आरक्षणाच्या जागेवर चांगल्या शाळेत मोफत प्रवेश मिळण्यासाठी पालकांनी चक्क बोगस पुरावे जोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आरटीई प्रवेश यादी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

आर्थिक, दुर्बल घटकातील मुलांना चांगले शिक्षण घेता यावे; यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये शाळेत २५ टक्के जागा राखीव करून त्या जागांवर लॉटरी पद्धतीने नंबर लागलेल्या मुलांना मोफत प्रवेश दिले जात असतात. थेट अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सुरवातीला वशिलेबाजी होत असल्याने हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. तरी देखील यात खोटे पुरावे जोडून फसणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. 

RTE Admission
Beed : बीडमधील जलदुत! बायकोच्या अंगावरचे सोनं विकून गावकऱ्यांची तहान भागवतोय

प्रवेश आदी वादाच्या भोवऱ्यात 

आरटीई कायद्याचा गैरवापर करून नामांकीत शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले जात असल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. रायगड जिल्‍हयातील आरटीई (शिक्षण हक्‍क कायदा) प्रवेशाची यादी पुन्‍हा एकदा वादाच्‍या भोवऱ्यात सापडली आहे. आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून वास्तव्याचे बोगस पुरावे जोडल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खारघर येथे उघडकीस आली आहे. यामुळे खरा हक्क असलेल्या मुलांना येथे प्रवेश मिळत नसल्याचे दिसून आले आहे. 

RTE Admission
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा झटका; एकीकडं राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार, दुसरीकडं महायुती फुटली!

प्रवेश रद्दची मागणी 

काही दिवसांपूर्वी अलिबाग येथील खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनीही असाच प्रकार उघडकीस आणून कारवाईची मागणी केली होती. यानंतर आता वास्तव्याचे बोगस पुरावे जोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या पालकांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत अशी शिफारस गट शिक्षणाधिकारी यांनी केली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com