Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा झटका; एकीकडं राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार, दुसरीकडं महायुती फुटली!

Nandurbar News : नंदुरबार तालुका भाजप अध्यक्ष निवडीच्या वेळी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री गावित यांनी भाजप पक्ष संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत युती न करण्याची घोषणा
Nandurbar Politics
Nandurbar PoliticsSaam tv
Published On

सागर निकवाडे


नंदुरबार
: महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून वाऱ्यासारखी दिशा बदलत आहे. एकीकडं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडं महाराष्ट्राचं राजकारण जिथून सुरू होतं, त्या नंदुरबारमध्ये महायुती जवळजवळ फुटल्यात जमा आहे. भाजप नेते विजय गावित यांच्या विधानानं नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील वाद पुन्हा उफाळून आला आहे.

जिल्ह्यातील आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या मित्र पक्षांसोबत युती न करण्याची घोषणा भाजपाचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात केली आहे. यामुळे जिल्ह्यात महायुतीत बिघाडी होण्याचे संकेत निर्माण झाले आहे.   

नंदुरबार तालुका भाजप अध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री गावित यांनी भाजपाच्या पक्ष संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही युती न करण्याची घोषणा केली आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात मित्र पक्षांवर युती विरोधी काम करत विरोधकांना मदत केल्याचा आरोप माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी केला आहे. 

Nandurbar Politics
Beed : बीडमधील जलदुत! बायकोच्या अंगावरचे सोनं विकून गावकऱ्यांची तहान भागवतोय

भाजप स्वबळावर लढणार 

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होणार आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार. इतकेच नाही तर सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची एकहाती सत्ता येईल; असा विश्वास माजी मंत्री गावित यांनी व्यक्त केला आहे.   

Nandurbar Politics
Sugarcane : ६० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन कमी; हवामान बदलामुळे घटलेल्या ऊस उत्पादनाचा परिणाम

मित्रपक्षात फूट 

माजी मंत्री गावित यांनी घोषणा केल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात महायुतीतील मित्रपक्ष विरोधात भाजप असेच चित्र निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुका लागल्यानंतर महायुतीतील मित्र पक्ष काय भूमिका घेतात हे पाहण्या महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com