Teacher Scam: शिक्षक घोटाळ्यात नवा ट्विस्ट, बोगस शिक्षकांचा बाजार; शिक्षक घोटाळ्यात मृत अधिकाऱ्याची एण्ट्री

Teacher Scam: शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी बोगस शिक्षक भरती एका मृत अधिकाऱ्याने केलीय. ही बोगस भरती कुणी आणि कशी केली आहे?
Teacher Scam
Teacher Scam
Published On

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी बोगस शिक्षक भरती एका मृत अधिकाऱ्याने केलीय. बसला ना तुम्हाला धक्का. हे खरं आहे. ही बोगस भरती कुणी आणि कशी केली आहे? सामच्या बातमीवर मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. साम टीव्हीने 580 बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघड केला आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. या घोटाळ्यात सोमेश्वर नेताम नावाच्या मृत शिक्षण अधिकाऱ्याची एण्ट्री झालीय.

एवढंच नाही तर मृत सोमेश्वर नेताम यांच्या सहीने 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत त्यांना वेतनही सुरु केलंय. तर ना. गो गाणारांनी या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच मांडलीय.

शिक्षक घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून शिक्षक भरती

2016 पूर्वीची नियुक्ती दाखवून बनावट शालार्थ आयडी बनवला

2016 ते 2024

बोगस सहीद्वारे बोगस शिक्षक भरतीचा आरोप

प्रत्यक्षात नियुक्ती 2 वर्षांनी करण्यात आल्या

बोगस शिक्षकांचे पगार सुरु करण्यात आले

या नियुक्तीसाठी 35 लाख रुपयांचा रेट

Teacher Scam
Fake Teacher Scam : शिक्षण विभागाला हादरवणारी बातमी; नागपुरात निघाले 570 शिक्षक बोगस, झाला इतक्या कोटींचा घोटाळा? पाहा व्हिडिओ

सामच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा अंग झटकून कामाला लागलीय. तर या प्रकरणात आतापर्यंत बोगस मुख्याध्यापक पराग पुंडके, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक निलेश मेश्राम, उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपीक सुरज नाईक या 5 जणांच्या मुसक्या आवळल्यात..दरम्यान चौकशीत निलेश मेश्रामने स्वतःच्या पत्नीलाही थेट मुख्याध्यापक बनवल्याचं समोर आलंय. याप्रकरणात वडेट्टीवारांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. तर ना. गो गाणार यांनी घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असल्याची शंका व्यक्त केलीय.

Teacher Scam
Scam : नागपुरातील सर्वात मोठा शिक्षक घोटाळा, तब्बल २०० कोटींचा गंडा, नेमकं प्रकरण काय?| VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com