Scam : नागपुरातील सर्वात मोठा शिक्षक घोटाळा, तब्बल २०० कोटींचा गंडा, नेमकं प्रकरण काय?| VIDEO

teacher appointment scam : नागपूर जिल्ह्यात बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरण उघडकीस आले असून २०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
Bogus Teacher
Bogus Teachergoogle
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Fraudulent Appointments of Teachers : नागपुरातील शिक्षक घोटाळा समोर आलाय. हा घोटाळा तब्बल१०० ते २०० कोटी रूपयांचा असल्याचे समोर आलेय. घोटाळा समोर येताच शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली.

बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली. या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग पुडके यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले. यासाठी नागपुरातील एस के बी उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर यादवनगर या शाळेचे बनावट शिक्षक असल्याचं कागदपत्र तयार केले. या बोगस बनवट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हासनगर यांनी आर्थिक व्यवहार करून नानाजी फडके विद्यालय देवताडा तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे मुख्यध्यापक पदावर मंजुरी दिली.

Bogus Teacher
Maharashtra Politics : पुण्यात मध्यरात्री खलबतं.. अमित शाहांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, चर्चा काय झाली?

मंत्रालय स्तरावर नेमलेल्या समितीत नागपुरात बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. नुकतेच मंत्रालयीन स्तरावर समितीच्या अहवालानंतर बनावट शिक्षक नियुक्त प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित केले आहे.

Bogus Teacher
Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर जबरी हल्ला, कुस्तीच्या फडातच चोपला|VIDEO

माजी आमदार, नागो गाणार काय म्हणाले ?

नागपुरात शिक्षक भरती घोटाळा झालेल्या प्रकरणांमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्यात 570 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांची बोगस पद्धतीने नियुक्ती झाल्याचा समोर आल्याचे नागे गाणार म्हणाले. नागपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून बोगस भरती घोटाळ्याचे रॅकेट चालवले जात आहे. यामध्ये शिक्षण भरती प्रत्यक्ष बंद असली तरी मंत्रालय स्तरावरून शिक्षक भरतीसाठी मान्यता मिळायची यासाठी आर्थिक व्यवहार व्हायचे आणि त्यातूनच शिक्षकांची नियुक्ती व्हायची. शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील अनेक बाबू आणि उपशिक्षणाधिकारी या सगळ्यांचा या रॅकेटमध्ये समावेश होता अनेक त्यांच्या बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या त्यातून लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आणि हा सगळा घोटाळा असल्याचा आरोप नागो गाणार यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com