Crime : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर जबरी हल्ला, कुस्तीच्या फडातच चोपला|VIDEO

Pune Gangster Nilesh Ghaywal Attacked at Wrestling Event : पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर आंदरूड येथील कुस्ती स्पर्धेदरम्यान हल्ला करण्यात आला. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला असून हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Attack on Gangstar Nilesh Ghaywal
Attack on Gangstar Nilesh Ghaywal
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी

Attack on Gangstar Nilesh Ghaywal : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर जबरी हल्ला झालाय. जत्रेनिमित्त गावी आलेल्या घायवळकर याला मारहाण झाली. कुस्तीच्या फडातच काही जणांनी घायवळ याच्यावर हल्ला केला. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा भरल्या होत्या. कुस्तीचे आयोजन निलेश घायवळ याने केल्याची माहिती मिळेतय. कुस्ती दरम्यान पैलवानाची भेट घेत असताना धक्काबुक्की झाली, त्यानंतर वाद उफळला. धक्काबुक्की करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती मिळाली. घायवळ याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे.

Attack on Gangstar Nilesh Ghaywal
Maharashtra Politics : पुण्यात मध्यरात्री खलबतं.. अमित शाहांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, चर्चा काय झाली?

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावरवर भूमध्ये हल्ला करण्यात आला. भूम तालुक्यातील आंदरूड गावाचे ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. हल्ला करुन फरार झालेल्या हल्लेखोराचा वाशी पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. आंदरूड येथे यात्रेनिमित्त प्रसिद्ध कुस्तीपटू थापाच्या कुस्ती वेळी हा प्रकार घडला. यात्रेतील कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन गुंड निलेश घायवळ याने केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Attack on Gangstar Nilesh Ghaywal
Crime : विवाहितेशी संबंध, ५ जणांकडून दोघांची हत्या, जंगलात रॉडने हल्ला करत घेतला जीव

घायवळ हे आखाड्यात पैलवानाची भेट घेत असताना त्याच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला आहे. हल्ला करणारा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवान असल्याची माहिती समोर आली. निलेश घायवळ याच्यावर हल्ला केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. दरम्यान हल्ला करणाऱ्या तरुणाला निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केली. तर हल्ला करणारा तरुण पळून गेला असून वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनेचा तपास करत आहेत दरम्यान याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. निलेश घायवळ याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू केला असून, लवकरच हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com