Yavatmal News
CCTV VideoSaam Tv

CCTV Video: बियर उधार न दिल्याने संतापला, तरूणाने बिअर शॉपी जाळून टाकली

Shocking Cctv Video: सोशल मीडियावर अशा अनेक घटना असतात ज्या पाहून प्रत्येकजण हैराण होतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरुणाने असं काही केलं आहे. ते पाहून प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे.
Published on

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील एका शहरात एका तरुणाने बियर उधार न दिल्याच्या कारणावरून थेट बिअर शॉपीलाच आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या आधारे पोलिसांनी विठाळा परिसरातील एका तरुणाला अटक केली आहे.

नेमके घडले तरी काय?

ही घटना यवतमाळच्या पुसद शहराच्या शिवाजी वॉर्डात घडली. बस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या बियर शॉपमध्ये एका तरुणाने उधारीमध्ये बियर मागितली. मात्र, शॉपी मालकाने उधार देण्यास मनाई केली. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने रात्रीच्या सुमारास दुकानात ज्वलनशील पदार्थ टाकून त्या दुकानाला पेटून दिले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. त्यावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला तो व्यक्ती दुकाना बाहेर आलेला दिसत आहे. ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर कापड बांधलेले आहे. काही वेळाने तो दुकाना समोर जातो आणि तेथे पेट्रोल ओततो आणि आग लावतो. दुकानाला आग लावल्यानंतर तो तेथून पळ काढतो. सर्व घटना अन्य दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडिओ (Video)इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर या व्हिडिलो लोकांनी अनेक लाईक्स आणि प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये कमेंट केली,''आता हेच पाहण्याच बाकी होतं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''देवा आता दुकान मालक जाम पश्चाताप करेल'' शिवाय काही यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

Yavatmal News
Shocking Video: सकाळी कामावर निघालेला युवक परतलाच नाही; बाईक चालवत असताना आला हार्ट अटॅक; जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com