Delhi Accident Saam Tv
देश विदेश

Accident: आयफोन घेतल्याचा आनंद, पार्टी करायला गेले असता काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ३ जिवलग मित्रांचा मृत्यू

Delhi Accident: दिल्लीतील ३ तरुण नवीन आयफोन खरेदी केल्याची पार्टी करण्यासाठी जात असताना भयंकर अपघात झाला. दुचाकीने महामार्गावर ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • नविन आयफोन घेतल्याचा आनंद ३ तरुणांच्या जीवावर बेतला

  • मुरथल येथे पार्टीसाठी जाताना दुचाकीची ट्रकला धडक

  • अपघातामध्ये तिन्ही तरुणाच मृत्यू

  • अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला

नविन आयफोन खरेदी केल्याच्या आनंदात दिल्लीतील ३ तरुणांनी आपला जीव गमावला. हे तिन्ही तरुण पार्टी करायला गेले होते. दुचाकीवरून जात असताना त्यांनी ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये तिन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग- ४४ वर नांगल खुर्द पुलावर झाला. हे सर्व तरुण सुलतानपुरीतील कृष्ण विहार येथे राहत होते. ते पार्टी करण्यासाठी सोनीपत येथील मुरथल येथे गेले होते. तिन्ही जिवलग मित्रांचा मृ्त्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक नावाच्या तरुणाने मागच्या मंगळवारी आयफोन १६ खरेदी केला होता. आयफोन घेतल्याच्या आनंदात त्याने आपले दोन्ही मित्र मयांक आणि प्रतीक यांना पार्टी देण्याचा प्लान केला. तिघेही पार्टी करण्यासाठी स्कूटरवरून मुरथल येथे पराठे खाण्यासाठी जात होते. पण हाच त्यांचा प्रवास अखेरचा ठरला. महामार्गावर एका ट्रकला त्यांच्या दुचाकीने धडक दिली. हा अपघात इकता भयंकर होता की यामधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपाघातामध्ये स्कूटरचा चक्काचूर झाला. जखमी झालेल्या एका तरुणाला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले पण त्याचा तोपर्यंत मृत्यू झाला. पोलिसांनी या तिन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. हे तिन्ही तरुण २० ते २३ वयोगटातील होते.तिघेही तरुण एकाच गावातील होते. ते लहानपणापासून मित्र होते आणि ते एकत्र शिक्षण घेत होते. एकाच वेळी या तिघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताच तपास पोलिस करत आहेत.

अपघातानंतर तपास अधिकारी एएसआय सुशील कुमार यांनी सांगितले की, 'स्कूटर ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातले नव्हते.' मयंकचे वडील विजय शर्मा हे दिल्लीत व्यापारी आहेत आणि मयंक हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तर आणखी एक मृत तरुण आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या अपघातानंतर तिन्ही तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Night Cream : फक्त 5 रुपयात घरीच बनवा कोरियन नाइट क्रीम; सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार; काय आहे योजना?

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? पाहा VIDEO

The Raja Saab: प्रभासच्या 'द राजा साब'ची रिलीज आधी बंपर कमाई; २४ तासांत अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 300% वाढ

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

SCROLL FOR NEXT