Shreya Maskar
आजकाल बाजारात 'कपल रिंग'चा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे तरूणाईचे हे मोठे आकर्षण आहे. तुम्हालाही बायकोला, नवऱ्याला, जोडीदाराला, ब्रॉयफ्रेंडला आणि गर्लफ्रेंडला जर गिफ्ट द्यायचे असेल तर 'कपल रिंग' बेस्ट ऑप्शन आहे.
'कपल रिंग'मध्ये सोने आणि डायमंडचे सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळते. साखरपुडा, लग्न समारंभासाठी हे खूपच खास वाटेल. तसेच तुम्हाला कोणाला प्रपोज करायचे असेल तर 'कपल रिंग' नक्की खरेदी करा.
'कपल रिंग' हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यात वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतात. तसेच तुम्ही या अंगठ्या कस्टमाइज देखील करू शकता.
'कपल रिंग' म्हटले की, हार्ट शेप आलाच. हार्ट शेपच्या अंगठ्या बाजारात खूप उपलब्ध आहेत. तसेच infinity symbol च्या रिंगना देखील खूप मागणी आहे.
तुम्ही रिंग कस्टमाइज करताना त्यात तुमच्या जोडीदाराचे नाव, तुमच्या दोघांच्या नावांचे पहिले अक्षर, तुमच्या काही खास तारखा तसेच thumb print देखील टाकू शकता.
साधारणपणे 'कपल रिंग' मध्ये गोल्डन आणि सिल्व्हर असे कॉम्बिनेशन मिळते. पण तुम्हाला हवे असेल तर रंग देखील कस्टमाइज करू शकता.
'कपल रिंग'मुळे हाताचे सौंदर्य वाढते. तसेच तुमच्याकडे तुमच्या प्रेमाची निशाणी राहते. तुम्हाला सिंपल लूकमध्ये देखील सुंदर अंगठ्या मिळतील.
तुम्ही 'कपल रिंग' ऑनलाइन आणि बाहेर बाजारात खरेदी करू शकता. तुम्हाला विविध व्हरायटी यात पाहायला मिळतात.