Shruti Vilas Kadam
पारंपरिक खणाच्या कापडापासून बनवलेली साडी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. या साडीमध्ये ठराविक नक्षी, चेक्स आणि रंगांची आकर्षक सांगड पाहायला मिळते.
खण आणि पैठणीचा मिलाफ असलेली ही साडी खूप आकर्षक दिसते. पैठणीच्या बॉर्डरसह खणाचे कापड वापरल्यामुळे साडीला रॉयल लूक मिळतो.
नऊवारी पद्धतीत नेसली जाणारी खणाची साडी पारंपरिक आणि एलिगंट दिसते. सण, समारंभ किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा प्रकार खास मानला जातो.
खणाच्या डिझाईनसह सिल्क कापड वापरून तयार केलेली ही साडी खूपच स्टायलिश दिसते. लग्नसमारंभ किंवा खास कार्यक्रमांसाठी हा प्रकार उत्तम पर्याय आहे.
खणाच्या नक्षी असलेली कॉटन साडी हलकी आणि आरामदायी असते. रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिस लूकसाठी हा प्रकार योग्य ठरतो.
या साडीमध्ये मुख्य साडी साधी असते आणि फक्त बॉर्डरमध्ये खणाचे कापड वापरलेले असते. त्यामुळे साडीला साधेपणा आणि पारंपरिक टच मिळतो.
आजकाल खणाच्या कापडाचा वापर करून विविध डिझायनर साड्या तयार केल्या जातात. मॉडर्न डिझाईन आणि पारंपरिक नक्षी यामुळे या साड्या खूप ट्रेंडी दिसतात.