Shruti Vilas Kadam
पैठणी साडीवर मोर, कमळ, वेल आणि विविध फुलांच्या नक्षी असतात. या सुंदर डिझाईन्समुळे साडीला खास पारंपरिक आकर्षण मिळते.
पैठणी साड्यांमध्ये जांभळा, हिरवा, लाल, निळा आणि सोनसळी असे उठावदार रंग वापरले जातात. हे रंग साडी अधिक सुंदर आणि उठून दिसणारी बनवतात.
महाराष्ट्रात अनेक मुली लग्नासाठी पैठणी साडीला प्राधान्य देतात. पारंपरिक महाराष्ट्रीयन ब्राइडल लूकसाठी ही साडी खूप खास मानली जाते.
पारंपरिक पद्धतीने हातमागावर विणल्या जाणाऱ्या पैठणी साड्या तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे या साड्या मौल्यवान आणि खास मानल्या जातात.
नारळाच्या आकाराची बॉर्डर असलेली पैठणी साडी खूप वेगळी दिसते. साध्या डिझाईनमध्येही ही बॉर्डर साडीला उठून दिसणारा लूक देते.
हलक्या आणि चमकदार कापडात तयार केलेली टिश्यू पैठणी साडी आधुनिक आणि स्टायलिश दिसते. सण-समारंभ किंवा लग्नसराईसाठी हा डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहे.
संपूर्ण साडीवर छोट्या बुट्ट्यांची नक्षी असलेली पैठणी साधी पण खूप एलिगंट दिसते. दैनंदिन सण किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी हा पॅटर्न उत्तम पर्याय आहे.