Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट पाहिजे? फक्त आठवड्यातून २ वेळा 'ही' घरच्या घरी तयार होणारी पेस्ट नक्की

Shruti Vilas Kadam

त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो

बीटरूट ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेला हायड्रेशन देते. या दोन्हींच्या मिश्रणामुळे त्वचेला नैसर्गिक गुलाबी चमक येण्यास मदत होते.

Face Care

डार्क स्पॉट्स कमी करण्यास मदत

बीटरूटमधील पोषक घटक त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात. अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचा शांत करून पिग्मेंटेशन कमी करण्यात उपयोगी ठरते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि अ‍ॅक्नेवर नियंत्रण

अ‍ॅलोव्हेरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते, तर बीटरूट त्वचेला स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवते.

Face Care | Saam Tv

त्वचा मॉइश्चराइज ठेवते

अ‍ॅलोव्हेरा जेल त्वचेला खोलवर हायड्रेशन देते. त्यामुळे कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ व तजेलदार दिसू लागते.

Face Care

चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत

बीटरूटमध्ये असलेले नैसर्गिक पिगमेंट त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक उजळ आणि फ्रेश दिसू शकते.

Face Care

लावण्याची योग्य पद्धत

एका बाऊलमध्ये १ चमचा बीटरूट ज्यूस आणि १ चमचा अ‍ॅलोव्हेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि १५–२० मिनिटे ठेवून नंतर कोमट पाण्याने धुवा.

Face Care

आठवड्यातून २–३ वेळा वापरा

चांगला परिणाम मिळवण्यासाठी हा फेस पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरणे फायदेशीर ठरते. नियमित वापरामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि ग्लोइंग दिसू लागते.

Face Care | Saam tv

Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Upit Recipe
येथे क्लिक करा