Upit Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि चविष्ट उपीट, जाणून घ्या सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

उपीट म्हणजे काय?

उपीट हा रव्यापासून बनवला जाणारा एक लोकप्रिय आणि हलका नाश्ता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातही हा पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.

Upit Recipe

लागणारे साहित्य

उपीट बनवण्यासाठी रवा, कांदा, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, तेल, मीठ, पाणी आणि कोथिंबीर लागते. काहीजण चव वाढवण्यासाठी त्यात गाजर किंवा मटारही घालतात.

Upit Recipe

रवा आधी भाजून घ्या

सर्वप्रथम कढईत रवा हलक्या आचेवर थोडा भाजून घ्या. त्यामुळे उपीट मोकळे आणि चविष्ट होते. भाजलेला रवा वेगळ्या भांड्यात काढून ठेवा.

Upit Recipe

फोडणी तयार करा

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

Upit Recipe

पाणी घालून मिश्रण तयार करा

कांदा चांगला परतल्यावर त्यात आवश्यक तेवढे पाणी आणि मीठ घाला. पाणी उकळू लागल्यावर त्यात भाजलेला रवा हळूहळू घाला.

Upit Recipe

उपीट शिजू द्या

रवा घातल्यानंतर मिश्रण सतत हलवत रहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. काही मिनिटांत उपीट चांगले शिजते आणि घट्ट होते.

Upit Recipe

कोथिंबीर घालून सर्व्ह करा

तयार उपीटवर कोथिंबीर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा. लिंबाचा रस घातल्यास चव आणखी वाढते. हा पदार्थ चटणी किंवा दह्यासोबत खूप छान लागतो.

Upit Recipe

Makeup Tip: उन्हाळ्यात घामामुळे मेकअप लगेच जातो? मग मेकअप करताना वापरा ही सोपी ट्रिक

Makeup Tips
येथे क्लिक करा