Manasvi Choudhary
घाम येणे हा शरीराचा सामान्य क्रिया आहे. मात्र रात्री घाम येण्याची कारणे वेगळी असू शकतात. अनेकांना रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम येतो शरीर गरम होते अश्या समस्या उद्भवतात.
रात्री घाम येण्याचे कारण म्हणजे क्षयरोग असू शकते अनेकांना फुफ्फुसांचा आजार असल्याने रात्रीच्यावेळी घामयेतो.
अति ताणतणावात असल्यास शरीर घाबरते यामुळे देखील शरीरातून घाम येण्यास सुरूवात होते.
नायलॉन किंवा सिंथेटिक कपड्यांमुळेही शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही. रात्री झोपताना सुती कपडे घाला.
ज्या लोकांना मधुमेह आहे आणि जे इन्सुलिन किंवा इतर औषधे घेतात, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी रात्री अचानक कमी होऊ शकते. अशा वेळी शरीरातून थंड घाम येतो.
दिवसभराचा मानसिक ताण किंवा भीतीदायक स्वप्नांमुळे मेंदू 'फाईट ऑर फ्लाईट' मोडमध्ये जातो. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि घाम येण्यास सुरुवात होते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास देखील रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम येतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.