Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

Buldhana Accident: बुलढाण्यातील नांदुरा-बुरहानपूर रस्त्यावर भीषण अपघात झालाय. एका खड्ड्यात भरधाव वेगात जाणारी वडाप टॅक्सी उलटली आहे. यामध्ये दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Buldhana Accident:
A wadap taxi overturned after falling into a roadside pit on the Nandura–Burhanpur road in Buldhana district.saam tv
Published On
Summary
  • नांदुरा–बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण रस्ते अपघात

  • भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

  • अपघातात १० प्रवासी गंभीर जखमी

संजय जाधव, साम प्रतिनिधी

बुलढाण्यातील नांदुरा - बुऱ्हाणपूर मार्गावर वडाप टॅक्सीचा भीषण अपघात झालाय. रस्त्याजवळ असलेल्या खड्ड्यात भरधाव टॅक्सी उलटली आहे. या भीषण अपघातात टॅक्सीतील १० जण गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Buldhana Accident:
पत्नी सोशल मीडियावर लाईव्ह असतानाच डोळ्यांसमोर पतीच्या अंगावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; काळाचा घाला

दरम्यान आज सकाळी बुलढाण्यातील छत्रपती संभाजीनगर मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला होता. आता संध्याकाळी बुलढाण्यात दुसरी दुर्घटना घडलीय.

ST बस अन् दुचाकीची समोरासमोर धडक, ३ तरुणांचा जागीच मृत्यू

बुलढाण्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धाड गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. भरधाव दुचाकी छत्रपती संभाजीनगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले तरुण हे बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील रहिवाशी होते.

Buldhana Accident:
ONGC गॅस गळती; अनेक ठिकाणी लागली आग, दूर दूरपर्यंत पसरल्या ज्वाळा; गावं करण्यात आली खाली|Video Viral

कैलास दांडगे, रवी चंदनशिव आणि अंकुश पाडळे असे मृत पावलेल्यांची नावे आहेत. तिन्ही तरुण हे विशीतील वयोगटातील होते. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या अपघातानंतर अपघातस्थळी मोठा जमाव झाला. महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातस्थळी जमा झालेली गर्दी पोलिसांनी पांगवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com